सुहाना खानने हटके पद्धधीतने दिल्या अगस्त्य नंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शाहरुख खानची लाडकी सुहाना खान अनेकदा चर्चेत असते. ती लवकरच ‘किंग’मधून रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही. मात्र, Showbiz वर्तुळात सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या डेटींगची बरीच चर्चा आहे. दरम्यान, तिने तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडला खूप क्यूट पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचा आणि अगस्त्यचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची तिन्ही मुले प्रसिद्धीच्या झोतात राहतात. आर्यन खानचे ‘स्टारडम’ चर्चेत असतानाच दुसरीकडे सुहाना खानही लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अब्रामबद्दल सांगायचे तर तो सध्या शिक्षण घेत आहे. वास्तविक वडील शाहरुख खान सुहाना खानबद्दल खूप प्रोटेक्टीव्ह आहे असंही म्हटलं जातं. पहिल्याच चित्रपटात सुहानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं तर चित्रपटांव्यतिरिक्त, सुहाना खानच्या डेटिंगच्या अफवादेखील उडत आहेत. अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याच्याशी सुहानाचे नाव अगदी पहिल्यापासून जोडले गेले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सुहानाने दिल्या युनिक पद्धतीने शुभेच्छा
सुहानाच्या शुभेच्छा
अमिताभ आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा २24 वर्षांचा झाला आहे. 23 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, सुहाना खानने रूमर्ड प्रियकर अगस्त्य नंदा याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचा क्यूट फोटो व्हायरल होत आहे. अगस्त्यच्या वाढदिवसाच्या दिवशी सुहाना खानने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली.
यामध्ये ती अगस्त्य नंदा यांचे कान ओढताना दिसत आहे. यादरम्यान ‘हॅपी बर्थडे’ लिहून एक मजेदार इमोजीही तिने ठेवला. सुहाना खानने त्याच्या मागच्या वर्षीच्या वाढदिवशीही त्याच्यासोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला होता. त्यामुळे त्यांची मैत्री खूपच घट्ट असल्याचेही दिसून येते आहे.
Bigg Boss 18 : सात बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर नॉमिनेशनचे संकट? दोन स्पर्धकांचा होणार पत्ता कट
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा
रिपोर्ट्सनुसार, ‘द आर्चीज’च्या शूटिंगपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, या नात्याबाबत दोघांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोघेही अनेकदा पार्टीत किंवा डेट नाईटलाही एकत्र दिसले आहेत. काही काळापूर्वी अगस्त्यने ‘इक्किस’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तर सुहानादेखील लवकरच वडील शाहरूख खानसह ‘किंग’मध्ये दिसून येणार आहे.
सुहाना खानचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर अनेक नेटकऱ्यांनी या दोघांच्या लग्नाबाबतही चर्चा सुरू केली आहे. एक युजरने म्हटले की “दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध असतील तर दोन मुलांमधील नाते घट्टपणे समजून घेतले पाहिजे”, तर अजून एका युजरने म्हटले आता तर ठरलंच. अनेकांनी या दोघांचे नाव जोडायला सुरूवात केल्याचे सोशल मीडियावर दिसून आले आहे.
‘स्त्री २’ च्या यशानंतर राजकुमार रावने खरंच मानधनात वाढ केली? अभिनेत्याने स्वतःच स्पष्ट केलं
सुहाना आणि अगस्त्यची मैत्री
शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. त्यामुळे सुहाना आणि अगस्त्य हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी असल्याचे सांगण्यात येते. इतकंच नाही तर अगस्त्यची बहीण नव्या नवेली नंदा ही सुहानाची खूपच जवळची मैत्रीण असून त्यांचा ग्रुप कायम एकत्र असतो. त्यामुळे नेटिझन्सने दोघांचेही नाव एकत्र जोडण्यास सुरूवात केली आहे.