Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याने बायकोला दिलं स्पेशल गिफ्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला…

कपिल होनरावने मुंबईतील अंधेरीमध्ये स्वत: चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर कपिलने नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केलाय.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 29, 2024 | 03:16 PM
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने बायकोला दिलं स्पेशल गिफ्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने बायकोला दिलं स्पेशल गिफ्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच या मायानगरीत घर असावे, असं वाटतं. असंच स्वप्न ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेता कपिल होनरावचं होतं. कपिलचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याने स्वतः साठी मुंबईत आलिशान घर खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी कपिलने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.

‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’मध्ये हॉलिवूडसह बॉलिवूडमधले ‘हे’ ६१ चित्रपट पाहायला मिळणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

कपिल होनरावने मुंबईतील अंधेरीमध्ये स्वत: चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कपिलने नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने भलं मोठं कॅप्शन देत चाहत्यांना गुड न्युज दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की,

बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?

 

“मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि ते ही अंधेरी सारख्या ठिकाणी… ४ कपडे आणि एक छोटी शी बॅग आणि खिश्यात १५०० रुपये घेऊन… गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या पोरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडुपला १० बाय १० च्या खोलीमध्ये राहताना जीव गुदमरल्या सारखा व्हायचा माझा. काडीपेटी सारखी घरं वाट्याची… अस वाटायंचं यार कुठे आलोय आपण. मुंबई फिल्म मध्ये जशी पाहतो तशी नाहीये. कुठे राहतोय आपण… ऑडिशनसाठी अंधेरीला यायचो तेव्हा मोठ्या मोठ्या इमारती पाहिल की वाटायच यार ही खरी मुंबई इथे घर असल पाहिजे. ऑडिशन झाल की मित्रांसोबत फिरताना उगाच बोलायचो इथे घर घेईन मी, तु तिथे घे… पण त्या वेळी ते फक्त दिवा स्वप्न असायचं. ही मुंबई लगेच आपलसं नाही करत तुम्हाला. खूप परीक्षा घेते. तुमच temperament चेक करते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावसं वाटायचं. पण माझ्यासोबत कायम एक खंबीर मुलगी होती. अगदी सुरवातीपासून. आज ह्या मुंबईत आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्यासोबती मुळे आहे आणि हे घर सुद्धा तिच्या सोबती शिवाय शक्यच झाल नसतं… पैसे आले की उधळ पट्टी करणारा मी पण एक एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली… रेणू आज मला खूप आनंद होतोय की तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देतोय. हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि ह्या फाटक्या पोराचा हात ज्या विश्वासाने तू धरलास. आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस त्याने लग्नानंतर ५ वर्षांत, इतक्या कमी वयात करोडोच्या वरचं घर घेतलं. तू नेहमी बोलतेस… ‘आप खुद पे विश्वास करो आप कर लोगे’ आज मला खूप आनंद होतोय. की तुझा विश्वास मी सार्थ ठरवला. I love you.. just be with me…”

“रोमिओ अँड ज्युलिएट” फेम अभिनेत्री ऑलिव्हिया हसीचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कपिल होनरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपूर्वीच कपिल काम करत असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या दोन्ही पर्वात कपिल पाहायला मिळाला होता. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर कपिल ‘जय जय शनिदेव’, ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत झळकला होता.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame actor kapil honrao buy new house in mumbai shared special video on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल
1

”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.