Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सूर नवा ध्यास नवा’चा अनोखा उपक्रम, गायकांना मिळणार ‘ही’ संधी

एक नवी ओळख आणि नवा ध्यास घेऊन ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे.

  • By साधना
Updated On: Aug 05, 2022 | 12:12 PM
sur nava dhyas nava

sur nava dhyas nava

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलं आहे. (Marathi News) आता आणखी नवी ओळख आणि नवा ध्यास घेऊन ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे.

प्रत्येक आठवड्यात ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तम रित्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार आहे. त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेलं आणि कवी- गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.

“ प्रत्येक स्पर्धेत एकच विजेता असतो आणि तोच बऱ्याचदा ठळकपणे दिसतो. पण सूर नवाच्या या स्पर्धेचं, या पर्वाचं वेगळेपण असं की, प्रत्येक आठवड्याचा सर्वोत्तम गायक हा एक विजेता असणार आहे. त्याच्या नावावर त्याचं स्वतःचं गाणं नोंदवलं जाणार आहे. कुठल्याही स्पर्धकाला याहून मोठी गोष्ट काय असणार. पार्श्वगायक म्हणून या मंचावरच त्याची ओळख प्रस्थापित होणं यापेक्षा त्याला मोठं बक्षिस काही असूच शकत नाही. आणि हे फक्त सूर नवाच्या मंचावरच घडू शकतं, असं अभिमानाने सांगावंसं वाटतं!” असं या उपक्रमाविषयी बोलताना ‘सूर नवा ध्यास नवा ‘ चे परीक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ते म्हणाले.

[read_also content=”सणांच्या महिन्यात सोन्या – चांदीच्या दरात वाढ https://www.navarashtra.com/business/gold-and-silver-price-increasing-in-country-nrsr-312229.html”]

“रिॲलिटी शोमध्ये घडणारी अत्यंत विलक्षण अशी ही घटना आहे. स्पर्धक गायकांसाठी दुर्लभ अशी गोष्ट स्पर्धेच्या या टप्प्यावर त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल एकविरा प्रॅाडक्शन्स आणि कलर्स मराठीचे खूप कौतुक आहे. नावाजलेल्या संगीतकार आणि गीतकारांचं गाणं कारकीर्दीच्या या टप्प्यावर मिळणं आणि ते या अशा मोठ्या मंचावरच प्रथम सादर करायचं भाग्य लाभणं, ही कितीतरी मोठी उपलब्धी आहे. त्या अर्थाने हे सगळे स्पर्धक खूप नशीबवान आहेत. या अनोख्या गोष्टीमुळे स्पर्धेलाही एक धार येईल नि ’ सूर नवा ‘ ची मैफिल आणखीनच बहारदार होत जाईल.” असं या उपक्रमाविषयी बोलताना कार्यक्रमाचे परीक्षक महेश काळे यांनी सांगितलं.

सूर नवाच्या या नव्या धाडसाबद्दल बद्दल बोलताना संगीतकार कौशल इनामदार म्हणाले की,“चित्रपटांव्यतिरिक्त गाणी ही एकेकाळी मराठी भावसंगीताची जीवनरेखा होती. मात्र आज ती गाणी तितक्या प्रमाणात बनत नाही. तशा चित्रपटविरहित गाण्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक ती आर्थिक इको सिस्टिम तयार करण्याची गरज होती नि या स्पर्धेच्या निमित्ताने कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने ती इको सिस्टिम तयार केली. शुभमसाठी नवं गाणं करताना त्या गाण्याच्या निमित्ताने मला नवीन होता आलं. मी आणि गीतकार मिलिंद जोशी शुभमच्या वयाचे झालो. त्या दृष्टीने हे गाणं आंम्हाला ताजंतवानं करणारं गाणं आहे नि हा आमच्याकरता खरंच आनंददायी अनुभव होता.”

“सूर नवा” च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात खूप कौतुक होत असून हे नवंकोरं पहिलं गाणं येत्या शनिवारी ६ ॲागस्टला रात्री साडे नऊ वाजता ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात रसिकांच्या भेटीला येत आहे. दर आठवड्यात एका नव्या गाण्याची भेट ही नवोदित गायकांबरोबरच रसिकांसाठीही मोठी पर्वणीच ठरणार आहे, असं कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख विराज राजे म्हणाले.

Web Title: Sur nava dhyas nava new initiative to give opportunity to singers nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 12:10 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainment News
  • Marathi News
  • marathi show

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
2

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
3

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
4

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.