भर कार्यक्रमात प्रेक्षकाने गायकाच्या चेहऱ्यावर फेकून मारला बूट; पंजाबी सिंगर संतापला अन्..., VIDEO VIRAL
Tauba Tauba Singer Karan Aujla Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भर कॉन्सर्टमध्ये गायकांवर किंवा रॅपरवर हल्ले होण्याचा प्रकार किंवा गैरवर्तन करण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. कैलाश खेर, मोनाली ठाकूर, आदित्य नारायण या गायकांसोबत पूर्वी असा प्रकार घडलेला आहे. अशातच आता ‘तौबा तौबा’ गायक करण ओजलाच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये परदेशात एक विचित्र प्रकार घडला आहे. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला येतोय ‘बॅक टू स्कूल’
सध्या ‘तौबा तौबा’ गायक करण ओजला म्युझिक कॉन्सर्टसाठी लंडनमध्ये आहे. कॉन्सर्ट दरम्यान, तो स्टेजवर गाणं गात असताना प्रेक्षकांमधून कोणीतरी त्याच्याकडे बूट भिरकवला. गायकाकडे बूट भिरकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गायकाकडे बूट भिरकवणाऱ्या व्यक्तीसोबत करणने स्टेजवरूनच वाद घातला. शिवाय त्याला गायकाने स्टेजवरही बोलावलं. पण तो काही आला नाही. करणच्या चेहऱ्यावर बूट आल्यामुळे तो चांगलाच संतापला आहे.
Somebody threw a shoe at Karan Aujla during a concert in London. pic.twitter.com/OKszJWTZB9
— Gagandeep Singh (@Gagan4344) September 7, 2024
व्हायरल व्हिडिओमध्ये, प्रेक्षकांमधून एक व्यक्ती करणच्या चेहऱ्यावर व्हाईट बूट फिरकवतो. करणच्या चेहऱ्यावर बूट लागल्यामुळे तो त्या प्रेक्षकावर चांगलाच संतापतो. लगेचच त्याने म्युझिक टीमकडे बॅकग्राऊंड म्युझिक थांबवण्याची विनंती केली. करण त्याला बूट देताना म्हणतो, “हिंमत जर असेल तर स्टेजवर ये आणि माझ्यासोबत लढ” करण ओजलासोबत घटलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे. कृपया आपल्या आवडत्या कलाकारांसोबत तरी असं वागू नये, अशी विनंती नेटकऱ्यांनी प्रेक्षकांना केली आहे.
करण औजला हा पंजाब फिल्म इंडस्ट्रीतला प्रसिद्ध गायक आहे. करणने आजवर अनेक हिट पंजाबी गाणी दिली आहेत. तर करणचं बॉलिवूड गाणं ‘तौबा तौबा’ देखील चाहत्यांच्या पसंदीस पडलं आहे. ह्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर कमालीची क्रेझ आहे. ‘तौबा तौबा’ गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला अजूनही खूप पसंती मिळताना दिसत आहे.