वच्छीने अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं...
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. दरम्यान, मालिकेसह मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. लोकप्रिय पात्रांपैकी काही पात्र म्हणजे, आण्णा नाईक, शेवंता आणि वच्छी… ही तिनही पात्र प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले.
“तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा कारण..”; राकेश रोशन यांनी हृतिकविषयी केला मोठा खुलासा
या मालिकेचे आजवर तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन फार काळ उलटला असून सध्या सोशल मीडियावर मालिकेतील वच्छी कमालीची चर्चेत आली आहे. मालिकेमध्ये वच्छीचे पात्र संजीवनी पाटीलने साकारलं होतं. अभिनेत्री संजीवनी पाटीलने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. वच्छी पात्राचा मृत्यू झाल्याचा सीक्वेन्स ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात दाखवण्यात आला होता. पण, ही मूळ कथा नसून संजीवनीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने हे पात्र मालिकेत मारलं गेलं, असं अभिनेत्री मुलाखतीत म्हणालीये.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अभिनेत्री संजीवनी पाटील म्हणाली की, “मला तो झी मराठीचा ‘सर्वोत्कृष्ट खलनायिके’चा मिळालेला पुरस्कार आज घरात धूळ खात पडलाय. मी तो पुरस्कार घेऊन ऑडिशनसाठी फिरू का सगळीकडे मला ‘काम द्या…’ ‘काम द्या…’ असं म्हणत? मी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात काम करण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सोडली. पण, पैसे वाढवून मागितल्यावर सेटवर वेगळा अनुभव आला. माझं असं झालं की… तू जे काम करतेस ते अडीच-तीन हजारांचं काम आहे का? मला हळुहळू त्रास व्हायला सुरुवात झाली. माझी भूमिका यांनी मारली. मालिका सोडल्यावर तुला यापुढे कोण काम देतंय ते सुद्धा मी पाहतो असं मला सांगण्यात आलं.”
Sky Force ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट!
दरम्यान, मुलाखतीत अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्री विरुद्ध हिंदी इंडस्ट्रीचीही तुलना केली. अभिनेत्रीच्या ह्या वक्तव्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. अभिनेत्री संजीवनी पाटील मराठी टिव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. संजीवनी पाटीलने ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिनही सीझनमध्ये त्याशिवाय ‘तुझा माझा ब्रेकअप’ नावाच्या टीव्ही मालिकेतही अभिनेत्रीने काम केलंय.