rakesh roshan reveals hrithik roshan locked himself inside bathroom reveals reason
हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने ‘धूम २’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘फायटर’, ‘वॉर’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांतून हृतिकने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हृतिकचा २०२५ या वर्षात ‘वॉर २’ आणि ‘अल्फा’ सारखे सुपर डुपर हिट चित्रपट रिलीज होणार आहेत. अद्याप या चित्रपटांची रिलीज डेट जाहीर झाली नसली तरीही तेच त्याच्या चित्रपटांची चर्चा सुरु झाली आहे. अशातच हृतिक रोशनला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. यामुळे त्याने स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं होतं. असा खुलासा अभिनेत्याचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी स्वत: एका मुलाखतीत केला आहे.
राकेश रोशन यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हृतिकला तोतरे बोलण्याची समस्या होती असे सांगितले. यावर राकेश रोशन म्हणाले, “मला त्याच्यासाठी वाईट वाटायचे. हृतिकने एकदा स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. कारण त्याला ‘थँक्यू दुबई’ म्हणायचे होते पण तो ती ओळ एकाच ओळीत बोलू शकला नाही. मला आठवतंय, आम्ही दुबईत होतो. ‘थँक्यू दुबई’ म्हणत असताना, तो ‘द’ या शब्दापाशी येऊन अडखळला. ते वाक्य पूर्ण व्यवस्थित म्हणता यावे, म्हणून त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. त्यामुळे मला वाईट वाटायचे. त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली. तो सकाळी लवकर उठत असे आणि एक तासभर वर्तमानपत्रे वाचत असे. हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांतील तो वर्तमानपत्र वाचत असे. आता तो गेल्या १०-१४ वर्षांपासून बोलताना अडखळत नाही किंवा तोतरे बोलत नाही.” असे म्हणत हृतिक रोशनने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचे राकेश रोशन यांनी सांगितले.
“उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्…”,नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत
हृतिक रोशनने त्याच्या अनेक मुलाखतीत त्याला लहानपणी तोतरे बोलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे. शालेय जीवनात या समस्येचा सामना करणे किती आव्हानात्मक होते, असेही अभिनेत्याने आपल्या जुन्या मुलाखतींमध्ये सांगितलेय. यापूर्वी, इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हृतिकने सांगितले होते की, कधी कधी त्याला असे वाटायचे की आयुष्य त्याच्यावर अन्याय करत आहे. कारण शाळेत त्याला तोतरेपणाचा त्रास इतका होत होता की तो बोलू शकत नव्हता. शाळेचे दिवस खूप वेदनादायक होते. शिवाय, डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की तो कधीही अभिनेता होऊ शकत नाही. तो इतका निराश झाला होता की अनेक महिने त्याला हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते.
Sky Force ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट!
हृतिक म्हणाला होता, “माझे कधीच मित्र किंवा मैत्रीण नव्हते. मी खूप लाजाळू होतो आणि शाळेतून परत आल्यानंतर मी फक्त रडत बसायचो, माझ्या पाठीच्या मणक्यात समस्या होती, डॉक्टरांनी सांगितले होते की ‘तू नाचू शकत नाहीस.’ मी इतका निराश झालो होतो की मी महिनोनमहिने जागा राहायचो आणि मला ते स्वप्नंच वाटायचे. ते खूप दुःखद होते आणि मी अभिनेता होऊ शकत नाही हे जाणून… मी चिंतेत झालो होतो. ती बाब माझ्यासाठी वेदनादायक होती.”
हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेता लवकरच ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर ‘वॉर’ चित्रपटाचा हा ‘वॉर २’ सिक्वेल आहे. या अॅक्शन ड्रामा चित्रपटात ज्युनियर एनटीआर देखील हृतिकसोबत दिसणार आहे.