(फोटो सौजन्य - अकाउंट)
अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांचा देशभक्तीवर अॅक्शन चित्रपट ‘स्काय फोर्स’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही माहिती ओटीटी प्लॅटफॉर्मनेच दिली आहे. तसेच आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीप्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करणार ‘सिकंदर’? सलमान खानच्या ‘या’ चित्रपटाचे मोडेल रेकॉर्ड?
प्राइम व्हिडिओने दिली माहिती
‘स्काय फोर्स’ ओटीटीवर येण्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता ‘स्काय फोर्स’ डिजिटल पद्धतीने प्रदर्शित होण्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट २१ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. ही माहिती स्वतः प्राइम व्हिडिओने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. प्राइम व्हिडिओने अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही नाचताना दिसत आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये, प्राइम व्हिडिओने लिहिले आहे की, “तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे? २१ मार्चपासून प्राइम व्हिडिओवर ‘स्काय फोर्स’.” असे लिहून ही माहिती शेअर केली आहे.
हा चित्रपट आधीच उपलब्ध होता
‘स्काय फोर्स’ हे प्राइम व्हिडिओवर आधीच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होता. परंतु तो फ्री होता आता प्राइम व्हिडिओ सबस्क्राइब केल्यानंतरही तुम्हाला तो पाहण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे, परंतु आता हा चित्रपट २१ मार्चपासून प्राइम व्हिडिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
“उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्…”,नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत
हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धावर आधारित आहे
‘स्काय फोर्स’ हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहाडिया मुख्य भूमिकेत आहेत. हा वीर पहाडियाचा पहिला चित्रपट आहे. या दोघांशिवाय सारा अली खान, निमरत कौर, शरद केळकर आणि वरुण बडोला हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. चित्रपटाची कथा नीरेन भट्ट, कार्ल ऑस्टिन, आमिल कियान खान आणि संदीप केवलानी यांनी लिहिली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही तो यशस्वी झाला.