IPL 2025 Opening Ceremony
आयपीएलच्या १८ व्या (IPL 2025) सीझनची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आयपीएलच्या १८ व्या सीझनला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore Vs. Kolkata Knight Riders) अशी रंगणार आहे. रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलचा उद्घाटन सोहळा देखील दणक्यामध्ये पार पडत असतो. यंदाच्या आयपीएल 2025चा उद्घाटन सोहळा येत्या २२ मार्च रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींसह अनेक सुप्रसिद्ध गायकही आपली जादू कायम दाखवणार आहेत. आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे. या सोहळ्यामध्ये कोण-कोण सेलिब्रिटी सहभागी होणार आहे ते आपण पाहणार आहोत…
“उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्…”,नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत
आयपीएलच्या १८ व्या सीझनची ओपनिंग ग्रँड सिरेमनी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या ओपनिंग सिरेमनीसाठी सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्रा, विक्की कौशल, श्रद्धा कपूर आणि संजय दत्तसह अनेक काही सेलिब्रिटी आयपीएलच्या १८ व्या सीझनच्या ओपनिंग ग्रँड सिरेमनीचा हिस्सा असणार आहेत. शिवाय, या यादीमध्ये अमेरिकन पॉप बँड वन रिपब्लिकचं (One Republic) नावही सामील आहे. या बँडला ओपनिंग ग्रँड सिरेमनीमध्ये सादरीकरण करण्यासाठी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. शाहरुख खान त्याच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमला (Kolkata Knight Riders)पाठिंबा देताना दिसणार आहे, तर सलमान खान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओपनिंग ग्रँड सिरेमनीला हजेरी लावणार आहे.
अभिनेत्री करूणा वर्माच्या घरातून लाखोंचे दागिने चोरीला; पोलिसांकडून तपास सुरू
२२ मार्चची संध्याकाळ खूप खास असणार आहे. कारण, त्या उद्घाटन समारंभाला कतरिना कैफ, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, जान्हवी कपूर, करीना कपूर, पूजा हेगडे, आयुष्मान खुराना, सारा अली खानसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलच्या १८ व्या सीझनच्या ओपनिंग ग्रँड सिरेमनीसाठी उद्घाटन समारंभात अर्जित सिंग, श्रेया घोषाल, करण औजला, दिशा पटानी, श्रद्धा कपूर आणि वरुण धवन हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. वन रिपब्लिक बँडसोबत करण औजला आणि दिशा पटानी परफॉर्म करताना दिसणार आहे. या उद्घाटन समारंभात अनेक मोठे खेळाडूही दिसणार आहेत. गेल्या सीझनमध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनू निगम आणि एआर रहमान यांसारख्या कलाकारांनी आपल्या दमदार शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Sky Force ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट!
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB)चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएलच्या उद्घाटन समारंभासाठी सामना सुरु होण्याच्या आधीच्या २५ मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. तेवढ्या वेळात प्रेक्षकांना हा छोटासा पण मनोरंजक कार्यक्रम पाहायला मिळेल, याची आम्ही खात्री देतो. अद्याप आम्हाला कलाकारांबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु हा एक उत्तम कार्यक्रम असेल, हे नक्की. आम्हाला अद्याप आयपीएलच्या १८ व्या सीझनच्या ओपनिंग ग्रँड सिरेमनीमध्ये कोण कोणते कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत, याची माहिती नाही. पण आम्ही तुम्हाला याची नक्की खात्री देतो की, प्रेक्षकांचं नक्की खळखळून मनोरंजन होणार… एकंदरीत, कोलकातातील लोकांसाठी आयपीएलच्या १८ व्या सीझनमधील पहिला दिवस हा एक सुंदर दिवस असेल.”
पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करणार ‘सिकंदर’? सलमान खानच्या ‘या’ चित्रपटाचे मोडेल रेकॉर्ड?
आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील चुरशीच्या सामन्याने होणार आहे. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या १० संघांमध्ये एकूण ७४ सामने १३ ठिकाणी खेळवले जातील. आयपीएलचा ग्रँड फिनाले २५ मे रोजी पार पडणार आहे.