Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर; ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच

भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात म्हटलं की पहिले आठवतात ते दादासाहेब फाळके. फाळकेंना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. राजा हरिश्चंद्र या सिनेमाने भारतात सिनेमाची नांदी सुरु झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 06:00 PM
भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर; ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच
Follow Us
Follow Us:
  • भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर;
  • ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच
भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात म्हटलं की पहिले आठवतात ते दादासाहेब फाळके. फाळकेंना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. राजा हरिश्चंद्र या सिनेमाने भारतात सिनेमाची नांदी सुरु झाली. पण तुम्हाला माहितेय का सिनेमामागे एका स्त्रिचा देखील हातभार होता. तर घडलं असं की, राजा हरिश्चंद्र सिनेमाच्या शुटींगचं शिवधनुष्य पेलताना फाळकेंना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्य़ांच्या पाठीशी होत्या त्या म्हणजे सरस्वतीबाई फाळके. सरस्वतीबाईंनी फक्त फाळकेचं घरच सांभाळलं नाही तर त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान देखील केलं. स्त्री घर आणि काम दोन्ही एकत्रितपणे सांभाळू शकते हे सरस्वती बाईंनी पटवून दिलं. सरस्वतीबाईंनी राजा हरिश्चंद्र या सिनेमाचं एडिटींग केलं.

सिनेमाचं एडिटींग करणाऱ्या त्या पहिला महिला भारतीय होत्या. या सिनेमाच्या शुटींग दरम्यान असलेल्या कलाकारांच्या जेवणापासून ते तांत्रिक बाबींपर्यंत त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. एवढंच नाही तर पहिल्या सिनेमासाठी दादासाहेबांना पैशांची चणचण भासायला लागली. त्यावेळी मागचा पुढाकार कसलाही विचार न करता सरस्वतीबाईंनी दागिने विकले.आणि भांडवल उभं केलं.

मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, युवा उद्योजकाशी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो

तो काळ आणि आजचा काळ यात फरक जरी खूप असला तरी सरस्वतीबाईंचं श्रेय मोठं आहे. आजच्या काळात आपण सिनेमा पाहताना अनेक तांत्रिकबाबी पाहत असतो. पण त्या काळी हे एडिटींग कसं करण्यात आलं आणि सरस्वती बाईंनी ही जबाबदारी लिलया कशी पेलली ते जाणून घेऊयात.

केमिकल्समध्ये फिल्मचे रोल वाळवण्याचं काम स्वत: सरस्वतीबाई करत होत्या. यानंतर सिक्वेलनुसार फिल्मच्या रिळ लावण्याचं काम त्या तासन् तास करत होत्या. त्यानंतर प्रत्येक फिल्मची बारकाईने तपासणी करणं या सर्वकामामुळे सिनेमा क्षेत्रातील पहिली महिला एडिटर म्हणून आणि तंत्रज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. खरंतर राजा हरिश्चंद्र सिनेमा फक्त दादासाहेबांचा विजय नव्हता तर या सिनेमासाठी सरस्वतीबाईंनी घेतलेले कष्ट देखील मोजमाप करता येणार नाही असे होते. आज सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर असणं सर्वसामान्य असलं तरी त्याकाळी हे शिवधनुष्य पेलणं महाकठीण काम होतं. तांत्रिक बाबी तर आहेतच पण सामाजात असलेली स्त्रीबाबतच्या मानसिकतेला खतपाणी न घालता सरस्वतीबाईंनी पतीची साथ सोडली नाही. आजंही राजा हरिश्चंद्र सिनेमा सरस्वतीबाईंशिवाय अपूर्णच.

परीक्षेत Dhurandhar, आदित्य धरच्या चित्रपटातील पात्रे अकाउंट्सच्या पेपरात, विद्यार्थ्यांना विचारले पात्रांवर आधारित प्रश्न

Web Title: The first female editor to grace indian cinema saraswatibai phalke without whom the film raja harishchandra would still be incomplete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: सततच्या चर्चांवर गोविंदांचा पलटवार; ‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू…’
2

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: सततच्या चर्चांवर गोविंदांचा पलटवार; ‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू…’

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.