डिजिटल दुनियेतली मस्ती 'त्या' तिघांच्या अंगलट येणार का ? ‘आंबट शौकीन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘आता लवरे लागणार’ असे आशय असलेले काही फोटो व्हायरल झाले होते. काही मराठी कलाकार मोबाईल हातात घेत आणि स्क्रिन समोर दाखवत त्यांनी हे विचित्र फोटोशूट केले होते. नेमकं हे फोटोशूट काय होतं, कशाबद्दल याचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आंबट शौकीन’ नावाच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटाच्या निमित्त ते फोटोशूट करण्यात आले होते.
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचं नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आंबट शौकीन’चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे आणि किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा आणि निलेश राठी निर्माते आहे. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे आणि अमित बेंद्रे यांचे आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीने बॉलिवूडला राम राम ठोकला? केली थेट पोलखोल
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निखिल, अक्षय, किरण आणि पूजा या चौघांसोबत चित्रपटात प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे. ही मल्टीस्टारर फिल्म येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“मुक्काम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला ठरला पहिला मराठी चित्रपट!
चित्रपटाविषयी दिग्दर्शक निखिल वैरागर यांनी सांगितलं की, ” ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचे कथानक फार मजेशीर आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची खात्री आहे.”