“देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कोणीही...”; विक्रांत मेस्सीचं वक्तव्य, टीकेचा भडीमार
विक्रांत मेस्सी, रिद्धी डोगरा आणि राशी खन्ना स्टारर, धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report)चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या विक्रांत मेस्सीसह सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशन दरम्यान विक्रांत वेगवेगळ्या चॅनल्ससला आणि युट्यूब चॅनल्सला इंटरव्ह्यू देताना दिसत आहे. मुलाखती दरम्यान, अभिनेत्याला भाजपा, मुस्लिम आणि भारत यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने दिलेल्या उत्तरामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीका टीप्पणी केली जात आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत मेस्सी एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. नुकतंच विक्रांतने युट्यूबर शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये विक्रांतने दिलेल्या उत्तरामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्याला मुलाखतीत तू पूर्वी कायमच भाजपावर टीका करायचास, पण आता तर तू भाजपाला पाठिंबा देतोय. इतका सेक्यूलर माणूस हिंदुत्ववादी कसा काय झाला ? या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “होय, ही गोष्ट खरी आहे, मी पूर्वी भाजपावर खूप टीका करायचो. पण मी देशभरात फिरल्यानंतर मला समजलं की, ज्या समोरून वाईट गोष्टी दिसतायत त्या वाईट गोष्टी नाहीत. अनेकदा लोकं म्हणायचे की, या देशात मुस्लिम असुरक्षित आहेत. मात्र कोणीही असुरक्षित नाही कुठल्याही मुस्लिमाला कसलाही धोका नाही.”
Question: आप BJP के बड़े आलोचक थे अब पुराने समर्थक कह रहे कि सेक्युलर से कट्टर हिंदू कैसे ?
Vikrant Massey : BJP का बड़ा आलोचक था। पर देश भर में यात्रा के साथ मुझे अहसास हुआ कि चीजें इतनी बुरी नहीं, देश में मुस्लिम ख़तरे में नहीं।
Full Podcast Tomorrow #VikrantMassey pic.twitter.com/9Nzf5igwEv— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) November 9, 2024
मुलाखतीच्या शेवटच्या भागात विक्रांत म्हणाला, “सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे मी आज सांगतो की, मी बदललो आहे.” अभिनेत्याच्या ह्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. मुर्ख, काय बोलत आहे याचं भाण तरी आहे का ?, तुझं वागणं योग्य आहे का ? अशा शब्दांत त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. विक्रांत मेस्सीबद्दल बोलायचं तर, अभिनेत्याचे वडील ख्रिश्चन, आई शिख आणि मोठा भाऊ मुस्लिम आहे. त्याच्या भावाचं नाव मोइन असून त्याने वयाच्या १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्विकारला.