Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप

भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2025 | 02:01 PM
मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई युवक काँग्रेस आक्रमक
  • लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
  • भाजपवर केले गंभीर आरोप
मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.

उन्नाव प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने सांताक्रूज ते चर्चगेट दरम्यान लोकलने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष शिव जतन यादव, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धावळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी थेट संवाद साधला व उन्नाव बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणात सरकारची भूमिका किती लाजिरवाणी आहे हे जनतेसमोर मांडले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भाजपच्या पोकळ घोषणा आहेत. भाजपचा खरा चेहरा उन्नाव प्रकरणाने उघड झाला असून, भाजप सत्तेच्या जोरावर सेंगरसारख्या बलात्कार्‍यांना वाचवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खरोखरच संवेदनशील, संविधानिक आणि न्यायप्रिय भूमिका घेणे गरजेचे असताना भाजप सत्तेचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देत आहे. या प्रकरणात आरोपीला दिलासा देणाऱ्या सर्व निर्णयांचा निषेध करत, पीडितेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जनजागृती मोहिमेदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. महिलांच्या सुरक्षेच्या नावाने केवळ जाहिरातबाजी करणारा भाजप प्रत्यक्षात आरोपींच्या बाजूने उभा राहतो, हा विरोधाभास जनतेपर्यंत पोहोचवणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे झीनत शबरीन म्हणाल्या.

Web Title: Mumbai youth congress has made serious allegations against bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Mumbai

संबंधित बातम्या

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
1

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा प्लॅन’ सज्ज
2

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा प्लॅन’ सज्ज

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
3

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक
4

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.