(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथचे सुपरस्टार सुर्या आणि बॉबी देओल सध्या त्यांच्या आगामी ‘कंगुवा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात बॉबी देओल नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट हिट व्हावा यासाठी निर्माते खूप प्रयत्न करत आहेत. ‘कंगुवा’ चित्रपटाचे बजेट जवळपास 350 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकार ‘कांगुवा’ चित्रपटाचे सातत्याने प्रमोशन करत आहेत. दरम्यान, ‘कांगुवा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांमध्ये चर्चा कायम ठेवण्यासाठी एक नवीन ट्रेलर चाहत्यांसाठी शेअर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- संजू राठोडने रचला इतिहास; गायकाला मिळाला अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये ओपनिंग करण्याचा मान!
‘कंगुवा’ चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये सूर्या आणि बॉबी देओल अतिशय खतरनाक अंदाजात दिसत आहेत. चित्रपटातील सूर्या आणि बॉबी देओलचा लूक पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या चित्रपटात सूर्या आणि बॉबी देओलसोबत दिशा पटानीही दिसणार आहे. मात्र, दिशा पटानीबाबत निर्माते अजून मत स्पष्ट केले नाही आहे. सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पटानी यांच्याशिवाय जगपती बाबू, रॅडिन किंग्सले, नटराजन सुब्रमण्यम, योगी बाबू, कोवई सरला, आनंदराज आणि केएस रविकुमार यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लोकांचं लक्ष फक्त सूर्या आणि बॉबी देओलकडेच वेधले आहे.
बॉबी देओलचा स्टनिंग लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सूर्या आणि बॉबी देओलचा हा चित्रपट स्टुडिओ ग्रीनच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनला आहे. यापूर्वी हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे ‘कांगुवा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता ‘कांगुवा’ हा चित्रपट १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. चाहतेही ‘कांगुवा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. ‘कांगुवा’ चित्रपटाच्या नव्या ट्रेलरने लोकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. हा चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा- संजू राठोडने रचला इतिहास; गायकाला मिळाला अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये ओपनिंग करण्याचा मान!
तसेच, बॉबी देओल या चित्रपटामध्ये आनखी नवनवीन चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका साकारताना दिसत आहे. अभिनेता आता लवकरच बॉलीवूड चित्रपट शैतान 2 आणि दृष्यम 3 साठी काम करताना दिसणार आहे. सध्या शैतान 2 च्या लेखनाचे काम सुरू आहे. दृष्यम फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटावरही एक टीम काम करत आहे. या चित्रपटामधीलही अभिनेता बॉबी देओल यांची भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.