Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? जयसिंगपूरजवळील दानोळी गावात दिवसाढवळ्या गोळीबाराची थरारक घटना घडली. सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमागे नेमकं कोण आहे? हत्येचं कारण काय? पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 03:51 PM
Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली घटना.
  • अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती.
  • गोळीबारामागील कारण आणि आरोपींचा शोध सुरू.
 

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सराईत गुन्हेगार महेश दळवी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्याने दळवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दानोळी गावात गोळीबार; परिसरात दहशतीचे वातावरण

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी महेश दळवी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे दानोळी गावासह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील तपास आणि आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, महेश दळवी यांच्यावर गोळीबार कोणी केला आणि त्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासातून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. माणगाव येथे 13 वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता जयसिंगपूर परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे ‘कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?’ असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: ४०० टक्के नफ्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला ३२ लाखांचा गंडा; सोशल मीडिया जाहिरात ठरली महागात

नाशिकमध्येही युवकावर गोळीबार; आरोपींचा शोध सुरू

दुसरीकडे, नाशिकच्या आडगाव परिसरातही एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत उमेश मालोदे बचावल्याची माहिती आहे. या प्रकरणी दाखल फिर्यादीच्या आधारे आडगाव पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे नाशिकमध्येही गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे नाशिकमध्ये गोळीबाराची घटना, तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात महेश दळवी यांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. जयसिंगपूरमधील गोळीबारामागील कारण आणि आरोपींची ओळख पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयसिंगपूरमध्ये गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे.

  • Que: गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: महेश दळवी यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

  • Que: . गोळीबार कोणी आणि का केला?

    Ans: गोळीबार कोणी केला आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जयसिंगपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Kolhapur jaysingpur danoli firing mahesh dalvi death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Firing News
  • In Kolhapur
  • Kolhapur Crime
  • maharashtra crime cases

संबंधित बातम्या

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार
1

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!
2

Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
3

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक
4

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.