Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक स्तरावर TVFचा डंका! IMDBbच्या Top 250 मालिकांच्या यादीत ‘Sapne vs Everyone’पटकावला पहिला क्रमांक

टीव्हीएफने जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप निर्माण केली असून, ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’ने आयएमडीबीच्या सर्वोत्तम २५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 13, 2026 | 03:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएफने जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप
  • टीव्हीएफने स्वतःची वेगळी ओळख
  • २५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत
Sapne Vs Everyone Season 2 IMDb Rating: टीव्हीएफने जागतिक स्तरावर आपली मजबूत छाप निर्माण केली असून, ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’ने आयएमडीबीच्या सर्वोत्तम २५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत टीव्हीएफच्या इतर मालिकांमध्ये ‘टीव्हीएफ पिचर्स’, ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘एस्पिरंट्स’ आणि ‘ये मेरी फॅमिली’ यांचाही समावेश आहे.

सत्ता विरुद्ध न्यायाचा संघर्ष, System चा दमदार ट्रेलर, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

टीव्हीएफने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

द वायरल फीव्हरने सातत्याने अशा कथा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत ज्या खऱ्या, भावनिक आणि सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेल्या वाटतात. अनेक वर्षांपासून टीव्हीएफने मध्यमवर्गीय जीवनाचे प्रामाणिक चित्रण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तिरेखा आणि प्रसंगांशी प्रेक्षक सहजपणे जोडले जातात. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’च्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आता या मालिकेने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशानिमित्त निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं आहे.

ड्रीमर्सनी खरोखरच मन जिंकलं

पोस्टर शेअर करताना त्यांनी याला अर्थपूर्ण कॅप्शन दिलं आहे. “यावेळी ड्रीमर्सनी खरोखरच मन जिंकले. ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’ पाहण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि प्रत्येक भावना मनापासून अनुभवण्यासाठी धन्यवाद. तुमचे हे प्रेम आमच्यासाठी सर्वकाही आहे. असं म्हणत त्यांनी #SapneVsEveryoneOnPrime असा हॅसटॅग वापरला. नवे पर्व, आत्ताच पाहा फक्त प्राइम व्हिडीओवर असं म्हणत त्यांनी पुढच्या पर्वाबाबत माहिती दिली.

२५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’

आयएमडीबीच्या सर्वोत्तम २५० दूरचित्रवाणी मालिकांच्या यादीत ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’चा समावेश झाल्यानंतर द वायरल फीव्हरने जागतिक आशयविश्वात आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. या यादीतील टीव्हीएफच्या इतर मालिकांमध्ये ‘टीव्हीएफ पिचर्स’ला ९.१ मानांकनासह ६४वा क्रमांक, ‘पंचायत’ला ९.० मानांकनासह ७०वा क्रमांक, ‘गुल्लक’ला ९.१ मानांकनासह ७४वा क्रमांक, ‘कोटा फॅक्टरी’ला ९.० मानांकनासह ८६वा क्रमांक, ‘एस्पिरंट्स’ला ९.१ मानांकनासह १३०वा क्रमांक आणि ‘ये मेरी फॅमिली’ला ८.९ मानांकनासह १८३वा क्रमांक मिळाला आहे.

मोठ्या प्रदर्शित कलाकृतींना मागे टाकत प्रवास

टीव्हीएफने अलीकडील अनेक मोठ्या प्रदर्शित कलाकृतींना मागे टाकत स्वतःला भारत, दक्षिण भारतीय मनोरंजनविश्व आणि अगदी हॉलिवूडपर्यंत दर्जेदार आशय देणारे सर्वात विश्वासार्ह निर्मिती संस्थांपैकी एक म्हणून सिद्ध केले आहे.

मालिकांच्या नव्या पर्वांची दमदार घोषणा

प्राइम व्हिडीओ प्रस्तुत कार्यक्रमातही टीव्हीएफचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्यांनी चित्रपट, नव्या मालिका आणि लोकप्रिय मालिकांच्या नव्या पर्वांची दमदार घोषणा केली. ‘ववन’ आणि ‘कॉलेज फेस्ट’सारखे चित्रपट, ‘पिरॅमिड’ आणि ‘वंश’सारख्या नव्या मालिका, तसेच ‘एस्पिरंट्स’, ‘पंचायत’, ‘ग्राम चिकित्सालय’, ‘सपने विरुद्ध एव्हरीवन’ आणि ‘संदीप भैया’च्या बहुप्रतीक्षित नव्या पर्वांची घोषणा करून टीव्हीएफने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा भव्य सादरीकरण सोहळा टीव्हीएफला त्या संध्याकाळचा सर्वात मोठा विजेता ठरवणारा ठरला.

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Web Title: Tvf sapne vs everyone ranks first on imdb top 250 tv shows list global success marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • Entertainment News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला
3

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
4

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.