Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी सेलिब्रिटींची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “संपूर्ण कुटुंबाला स्त्रीयांच्या हवाली करायला हवं…”

महाराष्ट्राच्या राजकारणातून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना मराठी सेलिब्रिटीही आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 23, 2025 | 05:32 PM
वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली. या प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सामान्य नागरिकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

या प्रकरणावर महाराष्ट्राच्या राजकारणातून रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना मराठी सेलिब्रिटीही आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अभिनेता अस्ताद काळे, अभिनेता पुष्कर जोग, अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिरोडकर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याच्या एक्स अकाउंटवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, “वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… आणि त्या आईबापांचा देखील… लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.” अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलेली आहे.

 

वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा! लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि… — Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 22, 2025

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; भावूक पोस्ट शेअर

शिवाय, अभिनेता अस्ताद काळे यानेही वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, “संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या… विशेषत: स्त्रीयांच्या हवाली करायला हवं… हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे… कायदा हा माणसांसाठी असतो… हैवानांसाठी नाही.” तर आणखी एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपला रोष व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो की, “आपल्या मुलींच्या अवस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल आई-वडिलांना किंवा घरच्या इतरांना काहीच माहित नसतं? की माहित असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत?? तसं असेल तर हे ‘माहेरचे’ देखील तेवढेच दोषी आहेत ना?? ”

The Traitors: मैत्रीच्या नावाखाली होणार विश्वासघात, करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ शोचा जबरदस्त प्रोमो रिलीज

वैष्णवी हगवणे प्रकरणावर अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग याने इन्स्टा स्टोरी शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने हगवणे कुटुंबीयांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेता पुष्कर जोग म्हणतो, “खूप लाज वाटते… जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय… आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी… आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता… पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतंच… पण, आता गप्प बसून चालणार नाही ना… माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या. Justice For Vaishnavi” असं पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटच्या भागात त्याने ‘जोगबोलणार’ असं म्हटलंय.

Web Title: Vaishnavi hagawane death case actor pushkar jog astaad kale hemant dhome shares angry post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • marathi actor
  • pushkar jog
  • Vaishnavi Hagavane

संबंधित बातम्या

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
1

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
2

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
3

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित
4

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.