Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान, सोहळ्यात अनेक आठवणींना दिला उजाळा

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आशाताईंना हा पुसस्कार प्रदान देण्यात आला. शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 25, 2023 | 08:59 AM
ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान, सोहळ्यात अनेक आठवणींना दिला उजाळा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना राज्यातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात हा सोहळा पार पडला. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीतील अनेक आठवणी शेयर केल्या.

[read_also content=”उज्जैन विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदींवर केली पीएचडी! ‘या’ निर्णयांचा अभ्यासात समावेश https://www.navarashtra.com/india/a-student-of-ujjain-university-did-a-phd-on-prime-minister-modi-nrps-378351.html”]

गेटवे ऑफ इंडिया परिसरात हा पार पडला सोहळा

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आशाताईंना हा पुसस्कार प्रदान देण्यात आला. शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मंगेशकर परिवारातील सदस्य, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह असंख्य मुंबईकर उपस्थित होते.

काय म्हणाल्या आशाताई

‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले  म्हणाल्या की, ‘हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न आहे.”

आठ दशकांपासू अधिक संगीत सृष्टीवर अधिराज्य

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने विविध छटांची हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशाताई यांचा 1933 साली जन्म झाला. आशाताईंना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 साली त्यांनी आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली आणि 1948 साली त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढची सात दशकं आशाताईने आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.  तब्बल हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये आशाताईंनी प्ले-बॅक सिंगर म्हमून गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये मेलडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताईंनी आतापर्यंत 11 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे आशाताईंनी हिंदी-मराठीबरोबरच 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषांचा समावेश आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. 2011 मध्ये आशाताईंचं नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशाताईंना आतापर्यंत तब्बल 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.

Web Title: Veteran singer asha bhosle honored with maharashtra bhushan award nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2023 | 08:57 AM

Topics:  

  • Asha Bhosale
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.