Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप

राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, तरीही कापसाच्या भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 14, 2025 | 09:38 AM
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; 'या' नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; 'या' नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ  शिंदेंनी अमित शहांना खिशात घातले; प्रकाश आंबेडकर 
  • पुण्यात पार पडली वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक 
  • महाराष्ट्रात ऊस आणि कापूस ही दोन महत्वाची पिके एकनाथ शिंदे
पुणे: भाजप नेते आजवर राज्यातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देत होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांचा सूर बदलला असून या निवडणुका शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना खिशात घातले आहे. ही राज्यातील नेतृत्व बदलाची नांदी असून पुढील महिना दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आपणास दिसतील, तसे झाले तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झाली. या बैठकीस अॅड. आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पॉवर आणि किमया काय आहे, हे पुन्हा दाखवून दिले आहे. त्यामुळे ते पुढील महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री दिसतील. शरद पवार हे चाणक्य आहेत, यात दुमत नाही. शरद पवार व एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन

वेगळ्या विदर्भाचा मुद्द अचानक चर्चेत आल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्रात ऊस आणि कापूस ही दोन महत्वाची पिके आहेत. कापसाला योग्य भाव नाही. राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, तरीही कापसाच्या भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजपने मन मोठे करून विरोधी पक्षनेते करणे गरजेचे 

विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारी सदस्य संख्या विरोधी पक्षांकडे नाही. सत्ताधारी भाजपने मन मोठे करून, राजकीय नैतिकता दाखवत विरोधी पक्षांपैकी मोठ्या पक्षाला विधानसभा व विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद द्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारण भाजपला सर्वच पक्ष संपवायचे आहेत, असेही अॅड. आंबेडकर यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी घेतला समाचार

भाजप सोडून सर्वांशी युती व आघाडी 

राज्यातील नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत वंचितने भाजप सोडून विविध राजकीय पक्षांसोबत युती व आघाडी केली आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकाही वंचित युती किवा आघाडी च्या माध्यमातूनच लढणार आहे. खेळ आता सुरू झाला आहे, यापुढे काय होते, हे पासून आम्ही राजकीय भूमिका घेऊ. राज्यासाठी एकच धोरण ठरवता येणार नाही. त्यामुळे भाजप सोडून सर्व, डावे उजवे पक्ष आम्हाला चालतील, असेही अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Prakash ambedkar said eknath shinde cm in maharashtra bjp mahayuti politics pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
1

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
4

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.