Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश देशमुखची खास भेट; रंगली खास चर्चा

‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाला अभिवादन करत दोघांनी केली चर्चा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2026 | 12:45 PM
राजा शिवाजीच्या निमित्ताने खास भेट

राजा शिवाजीच्या निमित्ताने खास भेट

Follow Us
Follow Us:
  • ‘राजा शिवाजी’च्या चित्रपटगृहातील प्रदर्शनापूर्वी रितेश विलासराव देशमुखची विकी कौशलशी भेट 
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली वारशाचा सोहळा!
  • संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्छा
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाच्या अगदी जवळ येत असताना, प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय क्षण समोर आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’मधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. या भेटीमुळे इतिहासप्रेमी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या क्षणाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशलने नुकतीच रितेश विलासराव देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ‘राजा शिवाजी’च्या निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनतीबाबत सखोल संवाद रंगला. तसेच विकी कौशल यांनी ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

रितेशने केले अनुभव शेअर 

या चर्चेदरम्यान रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’साठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली तयारी, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि अनुभव याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

निर्मात्यांकडून या संवादाची केवळ एक झलक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आली असून, विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या या खास भेटीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

सर्व जबाबदाऱ्या रितेशने सांभाळल्या 

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांच्या प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचे नेतृत्व रितेश विलासराव देशमुख करत असून, त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित हा ऐतिहासिक महाचित्रपट भारताच्या गौरवशाली इतिहासाला भव्य सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

अभिषेक बच्चनचे मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल! ‘राजा शिवाजी’ चित्रपटात साकारणार थोरल्या संभाजी राजांची भूमिका!

Web Title: Vicky kaushal and riteish deshmukh share a special meeting on the occasion of raja shivaji movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Riteish Deshmukh
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
1

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Exclusive: ‘अभंग हा माझ्या संगीताचा – आयुष्याचा अविभाज्य घटक’, – राहुल देशपांडे
2

Exclusive: ‘अभंग हा माझ्या संगीताचा – आयुष्याचा अविभाज्य घटक’, – राहुल देशपांडे

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी
3

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी

Exclusive: ‘टेचात आणि ठसक्यात बोलणारी इंदुराणी…प्रेम असंच राहू द्या’ – साक्षी गांधी
4

Exclusive: ‘टेचात आणि ठसक्यात बोलणारी इंदुराणी…प्रेम असंच राहू द्या’ – साक्षी गांधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.