Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

600 Not Out! ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर विजयी गर्जना; विकी कौशलच्या वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाले…

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फक्त विकीच नाही तर, त्याच्या घरातल्यांनाही आनंद झाला आहे. विकीचे वडील आणि प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावलेय.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 22, 2025 | 02:02 PM
600 Not Out! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर विजयी गर्जना; विकी कौशलच्या वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाले...

600 Not Out! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर विजयी गर्जना; विकी कौशलच्या वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ पाहायला मिळत आहे. १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला हा चित्रपट ओटीटीवरही गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर अनेक कोट्यवधींची उड्डाणे घेतल्यानंतर आता ओटीटीवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. २०२५ या वर्षातील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘छावा’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फक्त विकी कौशलच नाही तर, त्याच्या घरातल्यांनाही आनंद झाला आहे. विकी कौशलचे वडील आणि प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावले.

‘मी रागात मर्यादा विसरलो…’, आक्षेपार्ह जातीयवादी टिप्पणीनंतर अनुराग कश्यपने मागितली माफी!

विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा मिळवला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेलं. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने देशभरात ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरात चित्रपटाने ८०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विकी कौशलचे वडील शाम कौशल हे लेकाच्या चित्रपटाचं यश पाहून भारावले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत आपल्या लेकाचं कौतुक केलं आहे. ‘छावा’ चित्रपट हा सर्वाधिक कमाई करणारा देशातला तिसरा चित्रपट ठरला आहे.

प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या ‘गुलकंद’चे टायटल साँग रिलीज…

शाम कौशल यांनी ‘छावा’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टवर “६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. ‘पुष्पा २ हिंदी’, ‘स्त्री २’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला”, असं लिहलेलं आहे. तर यासोबत शाम यांनी कॅप्शनमध्ये “इतके प्रेम दिल्याबद्दल देवाचे आणि सर्वांचे आभार”, असं म्हटलं. शाम कौशल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. प्रसिद्ध चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलेला पोस्टर शाम कौशल यांनी शेअर केलेला आहे. सध्या विकी कौशलच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्याकडचा कामाचा कल सध्या वाढत आहे. ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ नंतर भारतात हा टप्पा गाठणारा हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. तर जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

“मतांसाठी ५०० रुपये घेणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये…”, म्हणणाऱ्या ट्रोलरची शालूने केली कान उघडणी

‘छावा’ चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंदीस आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘छावा’ चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत ‘छावा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे इतर मंत्री आणि संसदेतील इतर राजकीय व्यक्तीही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘छावा’च्या प्रचंड यशानंतर आता विकी संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट यशच्या ‘टॉक्सिक’ सोबत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. याशिवाय, विक्की ‘महावतार’ मध्ये देखील दिसणार आहे, जो अमर कौशिक दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट पौराणिक कथा आणि आधुनिक कथेचा एक अनोखा मिलाप असेल, अशी माहिती आहे.

Web Title: Vicky kaushal s chhaava enters rs 600 crore club sham kaushal calls it an all time blockbuster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Chhaava Movie
  • rashmika mandanna
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
1

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
2

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
3

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
4

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.