Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राष्ट्र’मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा

काही कलाकारांच्या केवळ उपस्थितीमुळे प्रेक्षकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आशयसंपन्न कथानकाला सकस अभिनयाची जोड देणारे कलाकार असलेला चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावतो. 'राष्ट्र' या आगामी मराठी चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळणार आहेत. दिग्गज कलाकारांच्या यादीत विक्रम गोखले यांचाही समावेश आहे. 'राष्ट्र' या चित्रपटात विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा 'राष्ट्र' २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 25, 2022 | 01:25 PM
‘राष्ट्र’मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा
Follow Us
Follow Us:

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली ‘राष्ट्र’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखलेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या उपस्थितीमुळं ‘राष्ट्र’ला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. गोखले यांनी आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते विक्रम गोखले ‘राष्ट्र’मध्ये काहीशा अनोख्या रंगात दिसणार आहेत. यात त्यानं एक धडाकेबाज राजकारणी साकारला आहे. ज्याच्या केवळ शब्दावर संपूर्ण कारभार चालतो असा राजकीय नेता या चित्रपटात विक्रम गोखलेंनी रंगवला आहे.

भगवे वस्त्र, कपाळाला टिळा आणि भारदस्त आवाजाच्या आधारे गोखलेंनी साकारलेला राजकारणी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आहे. ‘राष्ट्र’ हा चित्रपट वर्तमान काळातील राजकीय परिस्थितीवर कडक शब्दांत भाष्य करणारा आहे. यात आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामुळं समाजात उमटत असलेल्या पडसादांचं चित्र ‘राष्ट्र’मध्ये पहायला मिळणार आहे. प्रथमच मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या इंदरपाल यांनी या चित्रपटाद्वारे आरक्षणाची नवी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव आदी कलाकार आहेत. याशिवाय मंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही ‘राष्ट्र’च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहेत. मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या विक्रम गोखले यांनी ‘राष्ट्र’मधील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत समाजातील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मदत केल्याची भावना दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केली आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

Web Title: Vikram gokhales political arrow will be seen in rashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 12:43 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Vikram Gokhale

संबंधित बातम्या

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
1

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
2

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप
3

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज
4

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.