बॉलीवूडमध्ये अनेक प्रोजेक्ट्स साठी महत्त्वपूर्ण परिवर्तन झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. क्लासिक रोमँटिक चित्रपटांपासून ते विविध शैलींमध्ये चित्रपट विकसित होत आहेत. चित्रपट निर्माते आता नवीन प्रकारचे चित्रपट निर्मिती आणि नव्या कथा स्वीकारत आहेत. ज्यांना बॉक्स ऑफिसवर खरोखरच चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नवीन हॉरर कॉमेडी ‘मुंज्या’ सारख्या चित्रपटांचे यश याचा पुरावा आहे. तसेच यशराज फिल्म्सने स्वतःचे स्पाय युनिव्हर्स तयार करणे हे देखील भारतीय चित्रपट उद्योगात होणारी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे.
आता झरीन खानने या विकसित होणाऱ्या ट्रेंडबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आहे. या बद्दल बोलताना ती म्हणाली, ” केवळ आव्हानात्मकच नाही तर प्रेक्षकांनाही आवडेल अश्या प्रोजेक्ट्स चा भाग बनण्यास मी उत्सुक आहे आणि स्क्रिप्ट्सचा एक भाग होण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे जिथे मला माझ्या अभिनय क्षमतांचे प्रदर्शन करण्यास वाव आहे. मी नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे आणि मी नेहमीच माझ्या सीमा पार करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि मला विविध पात्रे एक्सप्लोर करायची आहेत ” असे तिने सांगितले आहे.
[read_also content=”झरीन खानचा नखराच न्यारा, लालभडक साडीत भासली जणू अप्सरा! https://www.navarashtra.com/movies/zareen-khans-looks-like-a-apsara-in-a-red-saree-538201.html”]
तिच्या कारकिर्दीत झरीन खानने ‘वीर’, ‘हेट स्टोरी 3’, ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ आणि ‘1921’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका स्वीकारल्या आहेत आणि कामगिरीसह ती उत्तम अभिनेत्री आहे. तिने दाखवून दिले की, हा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी ती उत्सुक आहे. अभिनेत्री यावर्षी प्रोजेक्ट्सची मनोरंजक लाइन-अप जाहीर करणार आहे. ती लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा होत आहे.