(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचे १६ ऑगस्ट २०२५ रोजी ६९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्व हळहळले होते. विशेषतः त्यांनी ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेली पूर्णा आजी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षक दोघेही भावूक झाले होते.ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीचं पात्र पुढे कोण साकारणार, याबाबत गेल्या काही आठवड्यांपासून प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत, मालिकेत नव्या ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे.
पूर्णा आजीच्या पात्रात आता नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भातील पहिला व्हिडिओ शेअर केला आहे.“अन्नपूर्णा निवासात पुन्हा एकदा आनंद घेऊन येणार पूर्णा आजी…” अशा कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत, नवीन पूर्णा आजींच्या आगमनाची झलक पाहायला मिळते. वेशभूषा आणि देहबोलीवरून त्या आजींची खास ओळख जाणवते, मात्र अद्याप त्यांच्या चेहऱ्याचे पूर्ण दर्शन झालेले नाही.या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी एका ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव यासाठी सुचवले आहे. सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की ही नवी पूर्णा आजी अमुक अभिनेत्री असू शकतात, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘एक दीवाना की दीवानियत’ विरुद्ध ‘थामा’, दिवाळीत थेटर वॉर; PVR INOX वर पक्षपाताचा आरोप!
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस करू नका असं अनेक चाहत्यांचं म्हणणं होतं. मात्र, याबाबत प्रोडक्शन आणि वाहिनीचे हेड कथानकाच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेतील असं सुचित्रा बांदेकर तसेच मुख्य अभिनेत्री जुई गडकरी यांनी सांगितलं होतं.व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूर्णा आजीच्या पारंपरिक वेशात घरात प्रवेश करताना दिसतात. मात्र, चेहरा अजूनही स्पष्टपणे न दाखवता थोडी उत्सुकता जपली आहे.मालिकेच्या पुढील भागांमध्ये ही नवी पूर्णा आजी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.