पब्जी खेळताना तरुणाचा झाला मृत्यू, जाणून घ्या कारण

  • नांदेडच्या माहूर तालुक्यात मोबाईलवर पब्जी गेम खेळताना १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाचे नाव राजेश नंदू राठोड असे आहे. राजेश हा शनिवारी ११.३० च्या सुमारास घराजवळ पब्जी गेम खेळत होता. घरातील मंडळी नागपंचमीच्या पुजेची तयारी करत असल्याने राजेशकडे कोणाचे लक्ष नव्हते.

नांदेड – कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व नागरिक घरी आहे. तरुणमंडळी घरी असल्याने सोशल मिडिया, गेम आणि मनोरंजन कार्यक्रम बघत विरंगुळा घालवत आहेत. त्यामुळे काही तरुण पब्जी मोबाईल गेम खेळत आपला वेळ घालवत आहे. नांदेडमध्ये तरुणाचा पब्जी खेळताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नांदेडच्या माहूर तालुक्यात मोबाईलवर पब्जी गेम खेळताना १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाचे नाव राजेश नंदू राठोड असे आहे. राजेश हा शनिवारी ११.३० च्या सुमारास घराजवळ पब्जी गेम खेळत होता. घरातील मंडळी नागपंचमीच्या पुजेची तयारी करत असल्याने राजेशकडे कोणाचे लक्ष नव्हते. 

राजेश हा घरा शेजारी पब्जी गेम खेळण्यात मग्न होता. अचानक त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही वेळा नंतर राजेशच्या वडिलांचे लक्ष गेले त्याच्याकडे गेले. राजेश हालचाल करत नसल्याचे त्यांना समजल्याने ते जवळ गेले. आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यांनी तात्काळ राजेशला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.