जर तुम्हाला वाटत असेल की फक्त तळलेले पदार्थ किंवा अल्कोहोलच तुमच्या लिव्हरचे शत्रू आहेत, तर एक मिनिट थांबा! तुम्ही चुकीचा विचार करताय. अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हार्वर्ड-स्टॅनफोर्ड प्रशिक्षित डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे की काही सामान्यतः सेवन केलेले पेये तुमचे यकृत हळूहळू खराब करू शकतात. म्हणजे नक्की काय हे आपण या लेखातून जाणून घेऊया आणि वेळीच तुम्ही या पदार्थांचे सेवन करणे थांबवा नाहीतर तुमच्या लिव्हरची हालत चांगल्या स्थितीत राहणार नाही (फोटो सौजन्य - iStock)
डॉ. सौरभ यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की हे ३ पेये फॅटी लिव्हर वाढवू शकतात आणि सिरोसिस सारख्या धोकादायक आजाराला कारणीभूत ठरू शकतात.
फॅटी लिव्हर ही एक सुरुवातीची स्थिती आहे, परंतु जर ती वेळीच रोखली नाही तर ती गंभीर रूप धारण करू शकते. लिव्हर नष्ट करणारे ते ३ पेये कोणते आहेत ते जाणून घेऊया
डॉ. सेठी स्पष्ट करतात की सोडा सारख्या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ही साखर यकृतामध्ये चरबी जमा करते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार साखरयुक्त पेये कितीही चांगली असली तरी ती लिव्हरसाठी विषासारखी असतात
जरी रेड वाईन हृदयासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात असले तरी, डॉ. सेठी म्हणतात की कोणतेही अल्कोहोल लिव्हरसाठी हानिकारकच ठरते. फॅटी लिव्हरसाठी अल्कोहोल हा सर्वात मोठा धोकादायक घटक आहे
डॉ. सेठी म्हणाले की, बाजारात उपलब्ध असलेले स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्समध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यातील लपलेल्या कॅलरीज आणि कॅफिनमुळे फॅटी लिव्हर आणखी बिघडू शकते
व्हिडिओच्या शेवटी, डॉ. सेठी असेही सुचवतात की पाणी, नारळपाणी, साखरेशिवाय असणारे ग्रीन टी आणि लिंबूपाणी हे पर्याय लिव्हरसाठी खूप चांगले आहेत