सावंतवाडी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पकडल्यानंतर त्याला “वनतारा” प्रकल्पात हलवण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. गवस यांनी ओंकार हत्तीच्या संरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले असून, “ओंकार हत्तीला वनतारा येथे नेऊ देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. तसेच ओंकार हत्तीवर बॉम्ब फेकणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.