आईशर ट्रक्स अँड बसेसकडून Eicher Pro X Diesel रेंज लाँच
VE कमर्शियल व्हेइकल्सच्या (VECV) व्यवसाय शाखा आईशर ट्रक्स अँड बसेसने 2 ते 3.5 टन स्मॉल कमर्शियल व्हेइकल (SCV) सेगमेंटसाठी तयार केलेली नवीन ‘आईशर प्रो X डिझेल’ श्रेणी अधिकृतपणे लाँच केली. ई-कॉमर्स, FMCG, कोल्ड चेन, फळे-भाज्या वितरण, तसेच पार्सल आणि कुरियर व्यवसायांसाठी खास डिझाईन केलेल्या या वाहनांमुळे लास्ट-माईल लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ‘आईशर प्रो X EV’ लाँच केल्यानंतर कंपनीने आता डिझेल व्हेरियंट सादर करून SCV बाजारपेठेत आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे. नव्या मॉडेलमध्ये खास E449 हे नवीन डिझेल इंजिन देण्यात आले असून, उत्कृष्ट इंधन क्षमता, उच्च अपटाइम आणि विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये उत्तम परफॉर्मन्स हे या श्रेणीचे मोठे वैशिष्ट्य आहे.
भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु
नवीन प्रो X डिझेलमध्ये 10 फूट 8 इंचाचा वर्गातील सर्वात मोठा कार्गो डेक तसेच 30,000 किमीचा सर्वात लांब सर्व्हिस इंटर्व्हल देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना प्रत्येक फेरीत अधिक माल वाहून नेण्याची क्षमता मिळते, संचालन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो.
VECV चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO विनोद अग्रवाल म्हणाले, “आईशर प्रो X डिझेलचे लॉन्च हे भारतातील लास्ट-माईल लॉजिस्टिक्स परिवर्तनाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इलेक्ट्रिक आणि डिझेल या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध असलेली प्रो X श्रेणी लॉजिस्टिक्स क्षेत्रात स्मार्ट, शाश्वत आणि कार्यक्षम उपाय देण्यासाठी सक्षम आहे.”
असं झालं तरी काय की Honda ने 6 वर्षात दुसऱ्यांदा ‘ही’ बाईक केली बंद? जाणून घ्या यामागील कारण
क्रॅश-टेस्ट प्रमाणित कॅबिन, एर्गोनॉमिक D +2 सीटिंग, ड्रायव्हर स्टेट मॉनिटरिंग सिस्टम (DSMS), DRL दिवे तसेच ‘माय आईशर’ ॲपद्वारे कनेक्टिव्हिटी, रिमोट इममोबिलायझर आणि 24×7 अपटाइम सेंटर सपोर्ट ही या श्रेणीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, असे VECV चे चीफ कमर्शियल ऑफिसर एस. एस. गिल यांनी सांगितले.
ही नवी श्रेणी भोपाळ येथील इंडस्ट्री 4.0-सक्षम प्लांटमध्ये तयार करण्यात येत असून, संपूर्ण महिला उत्पादन रेषेद्वारे असेंबल केली जाते. ‘मेक इन इंडिया’च्या भावनेशी सुसंगत असलेली प्रो X डिझेलची बुकिंग अधिकृत डिजिटल डीलरशिप नेटवर्क किंवा www.eichersmalltrucks.com वर सुरू आहे.






