अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या फ्रांसमध्ये आहे. फ्रांसमध्ये आपल्या सौंदर्याची झलक तेथील सिताऱ्यांना दाखवली आहे. मुळात, नेहा पेंडसे दुसरी मराठी अभिनेत्री आहे, जीला कान्समध्ये आमंत्रित केले गेले आहे. अभिनेत्री छाया कदम कान्समध्ये आमंत्रित केली गेलेली पहिली मराठी अभिनेत्री आहे. नेहाला पाहून फ्रांसचे वातावरण अधिक मधुर झाले होते.
अभिनेत्री नेहा पेंडसेने शेअर केले तिचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री नेहा पेंडसेने @nehhapendse तिच्या सोशल मीडिया हँडलवर कान्स फेस्टिवल २०२५ चे काही क्षण शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिने केसांमध्ये फुल माळला आहे, जो तिच्या लूकला अधिक बहारदार करत आहे.
'मॅडम, जी घर पर है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहचलेली अभिनेत्री नेहा पेंडसेला कान्स महोत्सवात पाहून चाहते खुश झाले आहेत.
तिने तिच्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिच्या संपूर्ण Look बद्दल माहिती दिली आहे.
'बाळकडू' सिनेम्यातील तिचा अभिनयाने तिने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.