पुन्हा एकदा पोलिओ रविवार सुरू
मुंबई/नीता परब: लस निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईतील परळ येथील हाफकिन महामंडळाचा मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकारकडून माैखीक पोलीओ लसीच्या २६८ दशलक्ष मागणी करण्यात आली आहे.
हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या गुणवत्ता व विश्वासार्हतेमुळे ही संधी मिळाली असल्याचे मत हाफकीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या लसींची निर्मिती येत्या आठ ते नऊ महिन्यात पूर्ण हाेणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेणार असल्याची माहिती हाफकीन महामंडळाकडून देण्यात आली.
स्वातंत्र्याआधीपासून हाफकीन संस्थेचा पाेलिओ लस बनविण्यास पुढाकार
भारत देश स्वातंत्र्य हाेण्यापूर्वी हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचे पाेलिओ लस तयार करण्यात पुढाकार हाेता. पहिली लस १९६० च्या दशकात बनविण्यात आली. याशिवाय ‘पाेलीओ रविवार ही संकल्पना देखील हाफकीन संस्थेची आहे. कालांतराने ही संकल्पना देशभर रावबिण्यात आली. २०१४ मध्ये भारत देश पाेलीओ मुक्त झाल्याचे घेाषित करण्यात आले. मागील सहा दशक हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ पाेलीओ लस, सर्पदंश, विंचूदंश अशी जीवरक्षक औषध तयार करण्यास महत्वाचा वाटा आहे.
‘पाेलिओ रविवार’ प्रभावीपणे राबविणार
भारत पाेलिओमुक्त झाल्याचे घाेषित केल्यानंतर,दरम्यानच्या काळात ‘पाेलिओ रविवार’ ही संकल्पना दर रविवारी न राबविता, महिन्यातून दाेन रविवार राबवली जाते. परंतु आता पुन्हा, हाफकीन संस्थेला मिळालेल्या नवसंजीवनीमुळे ही संकल्पना येत्या काही दिवसात दर रविवारी राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
अलर्ट माेडवर
भारत देशाच्या शेजारील देश पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भू्तान, नायजेरिया या देशांमध्ये आजही पाेलिओच्या केसेस आढळून येत आहेत. ज्यामुळे याचा धाेका पुन्हा भारत देशाला हाेऊ नये यामुळे केंद्र सरकार अलर्ट माेडवर आहे. परिणामी, भारतात पाेलीओचे रुग्ण आढळून नये यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून लसींची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे आणि म्हणूनच पाेलिओ रविवार पुन्हा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हापकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे सक्षमीकरण करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनास नुकताच सादर करण्यात आला आहे. या समितीच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि नियोजन विभागाच्या सचिवांचा समावेश करावा. या समितीने हाफकीनच्या सक्षमीकरणासाठी ५ वर्षांचा रोडमॅप तयार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले आहेत.
पोलिओ लसीकरणाला सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद
हाफकीन संस्थेसाठी सकारात्मक बाब
‘भारत सरकारकडून २६८ दशलक्ष लसींची मागणी करण्यात आली आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर लस निर्मितीकरीता भारत सरकारने हाफकीन संस्थेची निवड केली आहे. ही बाब हाफकीन संस्थेसाठी सकारात्मक आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यात ही लसींची ही निर्मिती पूर्ण हाेईल व येत्या काही दिवसात लसींच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षात सुरुवात हाेईल, हाफकीन संस्थेची विश्वासार्हता व गुणवत्ता ही बाब संस्थेसाठी अभिमानास्पद आहे’ – सुनील महिंद्रकर, व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ