'मुंज्या' या हॉरर चित्रपटातून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती टेनिस खेळताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा ऍथलीझर सेट घातला होता. या काळ्या ड्रेसमध्ये शर्वरी कमालीची हॉट आणि आकर्षक दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. शर्वरीसाठी हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. तर तिचे वेगवेगळे लुक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पाहा शर्वरीचा हा क्लासी आणि चाहत्यांना घायाळ करणारा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काही काळापूर्वी बॉलीवूडमध्ये प्रवेश केलेली शर्वरी वाघ हे अद्याप मोठे नाव नसले तरी तिचे सौंदर्य तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी पुरेसे आहे. परफेक्ट फिगर, उत्तम अभिनय आणि सौंदर्य असा उत्तम मेळ म्हणजे मराठमोळी शर्वरी वाघ
शर्वरी पूर्ण आत्मविश्वासाने केवळ बोल्ड आउटफिट्सच कॅरी करत नाही तर कोणत्याही आऊटफिट्समध्ये ती सुंदर आणि आकर्षच दिसते हे तिने पुन्हा सिद्ध केलंय
शर्वरी वाघने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती टेनिस खेळताना दिसत आहे. यावेळी तिने ब्लॅक मिनी स्कर्ट आणि वन शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे
यावेळी काळ्या रंगाचे जिम वेअर शर्वरीने घातले असून बस्टियर टॉपसह मिनी स्कर्टच्या आउटफिटची स्टाईल खूप क्लासी दिसत आहे आणि त्यात शर्वरीच्या सौंदर्याने भर घातलीये
शर्वरीचे कपडे खूपच कॅज्युअल होते यात शंका नाही, पण तरीही ती त्यात जास्तच स्मार्ट दिसत होती. शर्वरीने अत्यंत मिनिमल मेकअप केला असून अगदी साधीशी हेअरस्टाईल केल्याचे दिसून येत आहे
तिच्या या हॉट ड्रेससह शर्वरीने पांढरे स्पोर्ट्स शूज घातले होते, जे तिच्या स्टाईलमध्ये परफेक्ट कलर बॉम्ब इफेक्ट देताना दिसून येत आहे. सध्या शर्वरीची कोणतीही स्टाईल प्रसिद्धच होताना दिसतेय