Bride Covered in Mud Before Wedding After Car Falls ( कार कोसळल्यामुळे लग्नापूर्वी नवरी चिखलाने माखली )
लग्ननाच्या आधीच नवरीसोबत असं काही घडलं की, तिचा पांढरा शुभ्र ड्रेस चक्क चिखलाने माखलेला पाहायला मिळाला.या व्हिडिओ मध्ये तिचा पांढरा ड्रेस चिखलाने माखलेला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लग्नसोहळ्यात एका नवरीसोबत लग्नाआधी असं काही घडलं आहे की तिच्या लग्नाची सुरूवात हळदीने होण्याऐवजी चिखलाने झाली. नवरी- नवरदेवाला घेऊन जाणारी कार अचानक रस्त्यावरून शेतातल्या चिखलात पडली.यामध्ये नवरीचा पांढरा शुभ्र ड्रेस संपूर्ण चिखलाने माखलेला पाहायला मिळला.
मिळालेल्या माहिती नुसार ही ही घटना व्हिएतनाममधील तुयेन व्कांग प्रांतात घडली असे सांगितले जाते. तसेच ही घटना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता घडली. 21 वर्षीय ली वान व्हिएत आणि त्याची नवरी 19 वर्षीय डॅम थी शुआन लग्नासाठी आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. लग्नघर अवघ्या काही मिनिटांवर असताना त्यांची कार अचानक रस्त्यावरून घसरली आणि जवळपास एक मीटर खाली असलेल्या भातशेताच्या मळ्यात पडली.
Đón dâu phiên bản “lội bùn lội suối”: Cô dâu hóa thân thành tượng đất sét nguyên khối ngay trước giờ cử hành hôn lễ… 👰♀️ https://t.co/SZznjN5TxO — Đình Lê (@StRyuAka) November 13, 2026
अपघातानंतर नवरीला नवरदेवाच्या घरी नेण्यात आलं. तिथे तिने अंघोळ करून कपडे बदलले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी कुटुंबीय तिला रूग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवरी आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचं कळलं.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांना हसावं की रडावं हे कळलंच नाही. अनेक जण हसले, तर काहींनी नवरीच्या ड्रेसबद्दल आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या अशा घटनांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.






