तेजस्विनी लोणारी नेहमीच सुंदर दिसते आणि जेव्हा पारंपरिक साडीत ती फोटो पोस्ट करते तेव्हा तर चाहत्यांचा स्वतःच्या मनावर ताबाच राहात नाही. तेजस्विनीने नुकतेच पारंपरिक Vintage उपाडा सिल्क साडीमध्ये फोटोशूट केले आहे. आम्ही तिला साडीबाबत विचारले असता तिने आईची साडी असल्याचे सांगितले. पण या आकर्षक अशा उपाडा सिल्कमध्ये पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ तेजस्विनीने साधला आहे. तिचा हा लुक कसा आहे डिकोड करूया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तेजस्विनी लोणारी नेहमीच आकर्षक आणि सुंदर दिसते. विशेषतः तिचे साडीतील लुक हे कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि सणांसाठी उत्तम ठरतात
नुकताच तेजस्विनीने उपाडा सिल्क साडीतील लुक शेअऱ केला असून चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडलाय. निळ्या रंगाचे काठ असणारी ही साडी खूपच क्लासी दिसून येत आहे
तेजस्विनीने या साडीसह सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे. कानात आणि गळ्यात सोन्याचे दागिने घातले असून हातात मिक्स रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत
केसांमध्ये सुगंधी गजरा माळला असून आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे. नवरात्रीसाठीही तुम्ही तिचा हा लुक नक्कीच कॅरी करू शकता
महाराष्ट्रीयन शान असणारी नथ घालत तिने या लुकला चारचाँद लावले आहेत आणि या मॉडर्न नथीच्या डिझाईनमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसतेय
तेजस्विनीने या खास आईच्या साडीसह मेकअप मात्र मिनिमल ठेवला आहे आणि त्यामुळे तिचा लुक अधिक खुलून आलाय. कपाळावर टिकली आणि न्यूड लिपस्टिक शेडमध्ये तिचे सौंदर्य पहातच रहावेसे वाटतंय