स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपण्याची भिती अनेकांच्या मनात असते. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोनमध्ये नेहमी लो पावर मोड किंवा बॅटरी सेव्हर मोड चालू ठेवतात. मात्र बॅटरी सेव्हर मोडचा सतत वापर केल्यास स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो आणि स्मार्टफोन वापरण्याचा आपला अनुभव बदलू शकतो. तुम्ही देखील स्मार्टफोनमध्ये सतत बॅटरी सेव्हर मोडचा वापर करत आहात का? वेळीच याचे नुकसान जाणून घ्या, अन्यथा स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

लो पावर मोड किंवा बॅटरी सेव्हर मोड चालू केल्यानंतर फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट कमी होऊ शकतो. यामुळे स्क्रोलिंग, ॲनिमेशन आणि गेमिंग पूर्वीसारखे स्मूद राहत नाहीत. तर या मोडचा वापर करताना काही डिव्हाईसमध्ये टायपिंगदरम्यान हॅप्टिक फिडबॅक देखील केला जाऊ शकतो.

बॅटरी सेव्ह करण्यासाठी या मोडमध्ये ॲप्सच्या बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी मर्यादित केल्या जातात. याचा परिणाम ईमेल आणि दुसऱ्या ॲप्सच्या अपडेटवर होऊ शकतो. तर काही स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सॲपसारख्या मेसेजिंग ॲप्सचे नोटिफिकेशन देखील उशीरा येतात.

बॅटरी सेव्हर मोड चालू असल्यास फोनची स्क्रीन ब्राईटनेस देखील कमी होऊ शकते. तसेच, स्क्रीन टाईमआऊट देखील कमी होऊ शकतो, ज्यामुळे स्क्रीन लवकर बंद होऊ शकते.

बॅटरी सेव्हर मोडचा वापर करताना बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी कमी होतात. तसेच लोकेशन शेअरिंग फीचरवर देखील परिणाम होऊ शकतो.

बॅटरी सेव्हर मोड किंवा लो पावर मोडचा मुख्य उद्देश स्मार्टफोनची बॅटरी जास्तीत जास्त वेळापर्यंत टिकवण्याचा असतो. मात्र जर तुम्ही सतत या मोडचा वापर करत असाल स्मार्टफोनचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो. बॅटरी सेव्हर केवळ गरज असेल तेव्हाच वापरा.






