नारळ पाणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जाते. पाण्यात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन सुद्धा कमी होते. हिरव्या नारळाच्या आतील पाणी आणि खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि चरबी जळून जाण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा तरी नारळ पाण्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

एक कप नारळ पाण्यात ४६ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करताना कोणतेही महागडे सप्लिमेंट्स पिण्याऐवजी नारळ पाणी आणि त्यातील खोबऱ्याचे सेवन करावे.

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाणी प्यायले जाते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशनचा धोका सुद्धा कमी होतो.

नारळ पाण्याची चव आणखीनच वाढवण्यासाठी एक ग्लास नारळ पाण्यात लिंबाचा रस किंवा पुदिन्याची पाने मिक्स करून प्यावीत. यामुळे दिवसभर शरीर हायड्रेट राहते.

नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यानंतर ती पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळ पाण्याचा वापर करून तुम्ही विविध पदार्थ सुद्धा बनवू शकता.

नारळ पाणी प्यायल्यामुळे त्वचेवरील ग्लो वाढण्यासोबतच चेहरा अतिशय देखणा आणि डागविरहित दिसतो. याशिवाय नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.






