तापत्या उन्हात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी नियमित करा बेलाच्या सरबताचे सेवन
शरीराचे तापमान वाढल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर किंवा उन्हात बाहेर जाताना भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्यासोबतच तुम्ही बेलाच्या फळाचे किंवा रसाचे सेवन करू शकता.
बेलाच्या फळामध्ये असलेले कॅल्शियम हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे दात देखील मजबूत होतात. हाडांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आठवड्यातून एकदा बेलाचा रस प्यावा.
आहारात बदल झाल्यानंतर पोट बिघडते. याशिवाय अपचन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवल्यास बेलाचा रस प्यावा. बेलाचा रस प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते.
वजन कमी करताना फळांचा रस पिण्याऐवजी बेलाचा रस प्यावा. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि शरीर हलके वाटू लागते. २५० मिली बेलाच्या रसात २५० कॅलरीज असतात.
बेलामध्ये बीटा-कॅरोटीन आढळून येते, जे लिव्हरचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांनी बेलाचा रस प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.