Mumbai 3.0 Announcement in Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीबाबत देखील मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईबाबात मोठा निर्णय घेण्यात आला असून शहराचा विस्तार आणि कायापालट होणार असल्यास समोर आलं आहे. .या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. कोणत्या शहरांचा यात समावेश असणार ते जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पेत सांगितलं की, मुबंई विस्तारासाठी आता शासनाकडून हिरवा कंदिल देण्यात आलेला आहे. मुंबईच्या आजुबाजूच्या शहरांचा आता तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईत समावेश होणार आहे.

तिसऱ्या मुंबईत उरण, रायगड, पेण आणि नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड यांच्या विकासाबाबत कामं करण्यात येतील.

371 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत तिसऱ्या मुंबईचा विस्तार होणार आहे. यामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. मल्टिमॉडेल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सागरी महामार्ग त्याचबरोबर रेल्वेचं जाळं विस्तारलं जाणार आहे.

तिसऱ्या मुंबईच्या विस्तारासाठी पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 14 हजार 321 कोटी रुपये खर्च करून रस्ते उभारणार आहे एमएमआर प्रदेशात पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे मुख्यालय, अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत हा सर्व विभाग घेण्यात आले आहेत.

तिसरी मुंबईचा होणाऱ्या विस्तारामुळे पुणं देखील आता काही तासातच गाठता येणार आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेस-वेला जोडणारा हा मार्ग असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचा भाग येईल.

तिसऱ्या मुंबईत नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील 80 गावांचा समावेश होणार आहे. खोपटा नवनगर क्षेत्रातील 33 गावं, मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील 2 गावं, रायगड प्रादेशिक क्षेत्रातील 9 गावं अशा एकत्रित 124 गावांचा समावेश असणार आहे.






