हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. या दिवसांमध्ये प्रामुख्याने हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामध्ये मेथी, लाल माठ, मुळा, पालक इत्यादी भाज्या बाजारात उपलब्ध असतात. पांढऱ्या मुळ्याची भाजी अनेक घरांमध्ये केली जाते. शिवाय पांढरा मुळा कच्चा सुद्धा खाल्ला जातो. पण पांढऱ्या मुळ्यासोबतच लाल मुळा खाल्याने सुद्धा आरोग्याला अनेक फायदे होतात. लाल मुळ्यामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, फोलेट इत्यादी घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लाल मुळा खाल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
लाल मुळा खाण्याचे फायदे
लाल मुळ्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. लाल मुळा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखर स्थिर ठेवतात.
मुळ्यामध्ये आढळून येणारे विटामिन सी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लाल मुळ्याचे सेवन केल्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचे नुकसान होत नाही.
लाल मुळ्यामध्ये आढळून येणाऱ्या फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे रोजच्या आहारात मुळ्याचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी लाल मुळा फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही.
त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी लाल मुळ्याचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणाऱ्या विटामिन सी आणि झिंकमुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.