रशियाचा युक्रेनवर हल्ला (फोटो- सोशल मीडिया)
रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला
सार्वजनिक वाहतुकीला केले लक्ष्य
30 पेक्षा जास्त नागरिक जखमी
World News: गेले अनेक वर्ष रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण अशा स्वरूपाचे हल्ले करत आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे. या वेळेस रशियाने युक्रेनचे सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य केल्याचे दिसून आले. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे.
रशियाने युक्रेनच्या उत्तरी भागात म्हणजे सुमी त्या परिसरात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एका रेल्वेला लक्ष्य केले आहे. रेल्वेवे मोठा हल्ला केला आहे. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. रशियाने कीव शहराकडे जाणाऱ्या रेल्वेला लक्ष्य केले आहे.
रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. यामध्ये 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचे समोर आले आहे. हल्ला झाल्यावर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी लोकांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. गेले काही महिन्यांपासून रशिया युक्रेनचे रेल्वे जाळे उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
एक दिवस आधीच रशियाने युक्रेनवर 35 मिसाईल्स आणि 50 ड्रोनने हल्ला केला होता. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव करण्यात आला. युक्रेनला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा रशियाने घेतला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होताना दिसून येत आहे.
पुतिन करणार युक्रेनचा गेम
चीन दौऱ्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन व चीनचे प्रमुख शी जिनपिंग एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दौऱ्यानंतर पुतिन यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाल्याचे म्हटले जात आहे. कारण चीन आता रशियाला शस्त्रास्त्र पुरवणार आहे. त्यामुळे येत्या काळात युक्रेन आणि रशियातील युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
चीनमधील कार्यक्रमानंतर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. आम्ही रशियाला ज्या प्रकारे मदत करू शकतो, त्या प्रकारे करत राहू असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर उत्तर कोरिया आणि रशियात मैत्रीचे नाते असल्याचे पुतिन म्हणाले.
चीन रशियाचे सबंध मजबूत
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये विजयी परेडला हजेरी लावली. यामुळे रशिया आणि चीनमधील सबंध अधिक मजबूत झाले आहेत. चीन रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा करणार आहे. त्यामुळे रशियाची ताकद अधिक वाढणार आहे.