जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर हळूहळू शरीरात नकारात्मक बदल होऊ लागतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते, ज्यामुळे कोणतेही प्रकारचे कपडे घालताना खूप जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
झपाट्याने होईल वाढलेले वजन कमी! नियमित 'या' प्रभावी पेयांचे आहारात सेवन
ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. यामध्ये अँटिऑक्सिडंट कॅटेचिन चरबी जाळण्यास आणि चयापचय वाढवणारे घटक आढळून येतात.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आलं आणि दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक बाहेर पडून जातात.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सलेरीच्या पाण्याचे सेवन करावे. हे ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात सेलेरी भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा.
काकडी शरीरातील उष्णता कमी करते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडीच्या पाण्याचे सेवन करावे. रात्रभर काकडी पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि अतिरिक्त चरबी कमी होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाण्यात लिंबू पिळून सेवन करावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्याल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. ज्यामुळे वाढलेले वजन कमी होते.