शरीरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
अक्रोड खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नियमित अक्रोडाचे सेवन केल्यामुळे मेंदूचे कार्य निरोगी राहते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहते.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी आहारात ब्लूबेरीचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा इतर फळांचे नियमित सेवन करू शकता. सकाळच्या नाश्त्यात ताज्या फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारते.
डार्क चॉकलेट खाणे सगळ्यांचं खूप आवडते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. याशिवाय संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये राहतो.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आहारात तुम्ही मुळा, मेथी, ब्रोकोली, लाल माठ इत्यादी अनेक भाज्यांचे सेवन करूया शकता. या भाज्या खाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते.
सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ओट्सचे सेवन केल्यामुळे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते याशिवाय शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ओट्सचे सेवन करताना त्यात तुम्ही ड्रायफ्रूट, फळे, गाजर किंवा मसालेदार ओट्स बनवून सुद्धा खाऊ शकता.ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने आणि बी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.