उन्हाळ्यात शरीराची Immunity वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. उन्हाळा वाढल्यानंतर लिंबू पाणी पिण्यास जास्त प्राधान्य द्यावे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
उन्हाळा वाढल्यानंतर बेलाच्या सरबताचे सेवन करावे, शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी बेलाचे फळ अतिशय प्रभावी ठरते. या रसाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
पपईमध्ये आढळून येणारे पपेन हे एंजाइम पचनक्रियेला चालना देण्यास मदत करते . पपई खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्यला अनेक फायदे होतात.
काकडी खाल्यामुळे शरीर थंड आणि हायड्रेट राहते. या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर काकडी उपलब्ध असते. काकडी खाणे आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे.
उन्हाळ्यात शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित कलिंगड खावे. कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते.