उन्हाळ्याची उष्णता त्यात विजेचीही दिला धोका, मग काय कुटुंबाने थेट ATM मध्येच थाटला संसार; Video Viral
सोशल मीडियाचे जग अनेक रंजक गोष्टीने भरलेले आहे. इथे कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात तर कधी हास्यास्पद व्हिडिओ, इथे बऱ्याचदा विचित्र गोष्टीही शेअर केल्या जातात ज्यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलीडची असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरवून उठलं. व्हिडिओतील दृश्ये फार रोमांचक आहेत आणि ती तुम्हाला नक्कीच थक्क करतील. चला यात काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे, या ऋतूत उन्हाच्या उष्ण धारा जीवाची काहिली करतात. उन्हाच्या या तीव्र लाटांनी सर्वच कंटाळले असून यापासून वाचण्यासाठी लोक एसी, कुलर अशा उपकरणांची मदत घेतात. मात्र यातही जर वीजच गेली तर या उपकरणांचा उपयोग काय… उन्हाळा आणि त्यात विजेचा धोका नकोस करून ठेवत. अशीच एका घटना बिहारमधील एका कुटुंबासोबत घडून आले मात्र त्यांनी यानंतर आपले खुरापती डोकं लावले आणि थंड हवा खाण्यासाठी थेट ATM मध्ये जाऊन बसले.
व्हिडिओमध्ये दोन महिला आणि दोन मुले ATM मधील एसीच्या हवेत छान लोळत पडल्याचे दिसून आले. महिला बसल्या होत्या तर मुले झोपली होती. हे सर्व दृश्य एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि मग याचा सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओतील हे अजब-गजब दृश्य सर्वांसाठीच आश्चर्याचे ठरले कारण आजवर थंड हवेसाठी असे पाऊल उचलले नाही. ही घटना बिहारमधली असल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @studentgyaan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उष्णतेवर उपाय’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे बिहार नाही आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे युपीमधलं आहे भावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.