हार्मोन्सचे असंतुलन दूर करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रथिने आढळून येतात. जे संप्रेरकांच्या निर्मितीसाठी मदत करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित कडधान्यांचे सेवन करावे.
ब्राऊन राईस मध्ये फायबर आणि विटामिन बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यात तुम्ही ब्रोकोली, पालक, मेथी इत्यादी भाज्यांचे सेवन करू शकता. याशिवाय हंगामी फळांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स शरीरात हार्मोन्स संतुलित करण्याचे काम करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या बियांचे सेवन करावे.
चवीला आंबट गोड असलेली स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीजचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सुधारण्यासाठी वेगवेगळ्या बेरीजचे सेवन करावे.