
झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा 'हा' सोपा नियम
जेवण आणि झोपेमध्ये किती अंतर असावे?
योग्य वेळी जेवल्यास शरीराला होणारे फायदे?
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास शरीरावर कोणता परिणाम होतो?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पोषक घटकांची कमतरता, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप आणि शरीरात वाढलेला थकवा अनेक गंभीर आजारांचे कारण बनतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली कोणत्याही वयात हार्ट अटॅक, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार होऊ शकतात. तासनतास एका जागेवर बसून टीव्ही पाहणे, मोबाईल पाहत बसने इत्यादी गोष्टींमध्ये भान हरपून जाते. रात्रीचा आहार, झोप आणि जेवणाची वेळ संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे दोन्ही गोष्टींवर जास्त भर देणे आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये ठराविक अंतर असणे आवश्यक आहे. योग्य वेळी जेवल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि अपचनाचा त्रास कमी होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? जेवण आणि झोप यात किती अंतर असावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी
आयुर्वेदक डॉक्टरांच्या मते, पचनसंस्था निरोगी आणि कायमच सुरळीत राहण्यासाठी झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवावे. यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत चालू राहते. २ ते ३ तासांचे अंतर ठेवल्यास अन्नपदार्थ पचन होण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळतो. याशिवाय एसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होत नाही. याशिवाय ३ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवल्यास आरोग्य कायमच उत्तम राहील. जर तुम्ही रात्री ११ वाजता झोपत असाल तर ८ वाजता जेवावे. यामुळे अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ मिळतो. तसेच रात्रीच्या जेवणात अतिशय हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
जेवण आणि झोप यात योग्य अंतर ठेवल्यास खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. ऍसिडिटी किंवा अपचनाचा कोणताही त्रास होत नाही. अन्नपदार्थ पचन होण्यासाठी हवा तितका वेळ मिळतो. पण जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रिया बिघडून ऍसिडिटी, गॅस आणि आम्ल्पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपी नये.
रात्रीची शांत झोप शरीर दुरुस्तीसाठी अतिशय प्रभावी मानली जाते. यामुळे शरीराला आराम मिळतो. यासोबतच हार्मोन्स संतुलित राहतात, मेंदू शांत राहतो आणि पचनाच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळते. पण चुकीच्या वेळी जेवल्यामुळे पोटात जडपणा जाणवणे, खाल्लेले अन्नपदार्थ पचन न होणे आणि वारंवार झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.
रात्रीच्या आहारात अतिशय सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये सूप, दालखिचडी किंवा वरणभात खावे. याशिवाय दिवसभरात ३लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपण्याआधी हळद दुधाचे सेवन करावे. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीरातील अंतर्गत अवयवांना आलेली सूज कमी होते. रात्रीच्या जेवणात चिकन, मटण किंवा इतर मांसाहारी पदार्थ खाऊ नये.