केसांच्या वाढीसाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
आहारामध्ये ओट्स, तपकीरी तांदूळ इत्यादी पोषक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतील आणि केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. शिवाय या तांदळांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळून येते.
मेथीचे दाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. मेथी दाण्यांमध्ये भरपूर फायबर आढळून येते. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यावे.
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय या बिया तुम्ही ओट्स किंवा इतर पदार्थांवर टाकून खाऊ शकता.
हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता कमी होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे.
शरीरात कमी झालेली बायोटीनची पातळी वाढवण्यासाठी आहारात बदाम खावे. सकाळी उठल्यानंतर नियमित ४ ते ५ बदाम खाल्यास कॅल्शियम आणि बायोटिन वाढण्यास मदत होईल.