शरीरात वाढलेले High Uric Acid कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन
पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
चवीला आंबट असलेले अननस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये ब्रोमेलेन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि आरोग्य सुधारते.
चेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स इत्यादी घटक आढळून येतात. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित चेरीचे सेवन करावे.
उन्हाळा वाढल्यानंतर कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कलिंगड खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
फळांचा राजा म्हणून आंब्याची सगळीकडे ओळख आहे. आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेल्या फायबर आणि विटामिन सी मुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी होते.