विटामिन सी युक्त किवीचे पावसाळ्यात करा नियमित सेवन,
किवीमध्ये विटामिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होतो.
किवीमध्ये फायबर आणि अॅक्टिनिडिन नावाचे एंजाइम आढळते, ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर किवीचे सेवन करावे.
त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी किवी गुणकारी आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ई आणि विटामिन सी त्वचा हायड्रेट ठेवतात. याशिवाय वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करतात.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी किवीचे सेवन करावे. यामधील पोटॅशियम आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.
वाढलेले वजन कमी करताना आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. त्यामध्ये तुम्ही किवी खाऊ शकता. यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.