सणवार म्हंटल की आवर्जून साड्यांची खरेदी केली जाते. सर्वच महिलांना साडी नेसायला खूप जास्त आवडते. पैठणी, बनारसी, कांजीवरम इत्यादी रॉयल लुक देणाऱ्या साड्यांची आवर्जून खरेदी केली जाते. पण कायमच बनारसी आणि हेवी लुक देणाऱ्या साड्यांची खरेदी करण्याऐवजी अतिशय नाजूक साजूक डिझाईनच्या साड्यांची खरेदी करावा. हेवी लुक देणाऱ्या साड्यांच्या यादीमध्ये सिल्क साड्यांना सुद्धा विशेष मागणी आहे. त्यामुळे यंदाच्या सणावारांना या नाजूक आणि मखमली साड्यांची नक्कीच खरेदी करा. (फोटो सौजन्य – pinterest)
नाजूक सौंदर्याचा मखमली अंदाज! सणावारांच्या दिवसांमध्ये 'या' साड्या देतील रॉयल आणि हटके लुक

पश्चिम बंगालची ओळख असणारी जमदानी साडी सणांसाठी अतिशय उत्तम आहे. नाजूक फुलांची नक्षीकाम आणि सिल्क फॅब्रिकमधील साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते.

मध्य प्रदेशची ओळख असलेली चंदेरी सिल्क साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. ही साडी खूप जास्त नाजूक असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळावी लागते. सिल्क आणि कॉटनच्या धाग्यांचा वापर करून जटील पद्धतीने विणलेली साडी सणांसाठी उत्तम आहे.

राजस्थानची ओळख असलेली कोटा डोरिया भारतासह जगभरात फेमस आहे. या साडीवर अतिशय बारकाईने विणकाम केले जाते. साडी अतिशय मऊ आणि घाईच्या वेळी सहज नेसता येते.

सर्वच महिलांना मल कॉटनच्या साड्या नेसायला खूप जास्त आवडतात. मल कॉटनची साडी सर्वच ऋतूंसाठी उत्तम आहे. लाईटवेट आणि मऊ सूत अशी मल साडीची ओळख असल्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला जास्त पसंती देतात.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागात प्रसिद्ध असलेल्या कलमकारी साडीने सगळ्यांचं भुरळ पाडली आहे. ही कला सुमारे ३०० वर्ष जुनी आहे.






