फॉर्च्यूनर कार टपरीवर आदळली (फोटो- ai gemini)
फिर्यादी हे दुचाकीवरून हिंजवडी व्हेज दोन कडून चांदखेडकडे चालले होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या फॉर्च्यूनर कारने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन गणेश मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ पल्सर चालक ऑमकार विठोबा राऊत (वय २४, रा. नेरे-दत्तवाडी ता. मुळशी) यांना मागून धडक दिली. यात राऊत जखमी झाले. त्यानंतर फॉर्च्यूनर कार रस्त्याकडेला असलेल्या टपरीवर जाऊन आदळली. या अपघातात अमोल गायकवाड यांचा मृत्यू झाला.
Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू
फॉर्च्यूनर कार मधून जात असताना अमोल गायकवाड यांना गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या दोन दुचाकींना कारची धडक बसली. त्यानंतर कार रस्त्यात कडेच्या टपरीवर आदळली.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित कारच्या दिशेने धाव घेतली असता चालक गायकवाड हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गायकवाड यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.
म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन इर्टिका कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Ans: फॉर्च्युनर कारने मारुंजीने येथे दोन दुचाकींना धडक दिली.
Ans: फॉर्च्यूनर कार मधून जात असताना अमोल गायकवाड यांना गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.






