दिवाळीचा सण सुरू झाला आहे. या सणात सर्वजण फटाके फोडताना आणि त्यांची मजा लुटताना दिसतात. पण हे फटाके जर काळजीपूर्वक फोडले नाही तर आपल्या हातांवर इजा होऊ शकते. यामुळे हातांवर जळजळही होऊ लागते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही हातांवरील इजा ठीक करू शकता. याच्या वापरणारे हातांना होणारी जळजळही कमी होईल.
फटाक्यांनी हात भाजलेत? मग जळजळ कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, त्वचेवरील सर्व डाग होतील दूर
कोरफड - जळजळ दूर करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. फटाक्यांनी भाजलेल्या जागी ताजे कोरफड अथवा कोरफड जेल लावा. हे त्वचेला थंडावा मिळवून देण्यास मदत करते
बेकिंग सोडा - यासाठीची बेकिंग सोडा पाण्यात मिसळून एक पेस्ट तयार करा आणि जळालेल्या भागावर त्याला लावा. यामुळे हातांवरील सूज कमी होईल आणि जळजळही होणार नाही.
नारळाचे तेल - हे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि जळजळ कमी करण्यास कमी करते. जळलेल्या भागावर नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा, हे त्वचेवरील व्रण कमी करते.
मध - घराघरात उपलब्ध असलेल्या मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करण्यास आणि जखमांना ठीक करण्यास मदत करतात.
जर घरगुती उपाय करुनही जळजळ दूर होत नसेल किंवा फार खोलवर असेल तर ताबडतोब रुग्णालय गाठा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.